उद्योग क्षेत्रानुसार आपण जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी पाहणार आहोत.तसेच उद्योग उभारणीसाठी शासना कडून कोणकोणत्या योजना जिल्हा उद्योग केंद्र मार्फत राबविल्या जातात ते देखील आपण येथे पाहणार आहोत.
लघु उद्योग व कुटीर उद्योगांचा ग्रामीण भागात विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकार कडून औद्योगिक धोरण 1977 च्या अंमलबजावणीसाठी देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांची 1 मे 1978 पासून स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत आहेत. ग्रामीण भागामध्ये केले जाणारे उद्योगांचे सनियंत्रण जिल्ह्याच्या ठिकाणावरून करणे व सर्व उद्योगांचे जाळे निर्माण करणे हा जिल्हा उद्योग केंद्र स्थापनेचा मुळ उद्देश आहे.
उद्योजक व शासन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणुन जिल्हा उद्योग केंद्र कार्य करत असून ग्रामीण भागात उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणे तसेच उद्योजकांना सर्व प्रकारची मदत करणे व उद्योगांसाठी लागणारे विविध प्रकारचे परवाने सहजरीत्या उपलब्ध करून देणे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र महत्त्वाची भूमिका बजावते.
ग्रामीण भागातील उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जिल्हा उद्योग केंद्र मार्फत विविध कर्ज व प्रशिक्षणाच्या योजना राबविल्या जातात. जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी आपण येथे पाहणार आहोत.प्रत्येक उद्योग क्षेत्र व प्रकारानुसार जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी वेगवेगळी आहे. जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रमुख योजना खालील प्रमाणे आहेत.
- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( PMEGP)
 - जिल्हा पुरस्कार योजना
 - सुधारित बीज भांडवल योजना (एसएमएस)
 - जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना ( जिल्हास्तरिय योजना अंतर्गत)
 - उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (जिल्हास्तरिय योजना अंतर्गत)
 
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( PMEGP)
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजना एकत्रित करून केंद्र शासनाकडून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( PMEGP) ही योजना राबविली जाते. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार लोकांना उद्योग उभारणी करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सुलभ तत्वावर भांडवल उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
उद्योजकांना राष्ट्रियकृत बँकेमार्फत या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी मधील उत्पादने तयार करणाऱ्या उद्योग घटकांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून जास्तीत जास्त 25 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य तसेच जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी मधील व्यवसाय व सेवा उद्योगात मोडणाऱ्या घटकांना जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य बँके मार्फत केले जाते.
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना शहरी भागासाठी 15 % अनुदान व ग्रामीण भागासाठी 25 % अनुदान दिले जाते. यामध्ये लाभार्थ्याला स्वतःची 10 % रक्कम भांडवल म्हणून गुंतवावी लागते.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय जाती, अल्पसंख्यांक, माजी सैनिक, महिला, अपंग व्यक्ती या लाभार्थ्यांना शहरी भागासाठी 25 % अनुदान व ग्रामीण भागासाठी 35 % पर्यंत अनुदान दिले जाते. वरील लाभार्थ्यांना 5 % रक्कम स्वगुंतवणूक म्हणून करावी लागते.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( PMEGP) योजना राबविण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत अंमलबजावणी केली जाते.
शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी क्लिक करा.
जिल्हा उद्योग केंद्र मार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ही योजना राबविली जाते. या योजनेतून करता येणारे व्यवसाय व जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी मध्ये खालील क्षेत्रातील व्यवसाय समाविष्ट आहेत.
- वन संपत्तीवर आधारित उद्योग
 - खनिज संपत्तीवर आधारित उद्योग
 - कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग
 - कागद व धागा उद्योग
 - ग्रामीण अभियांत्रिकी तसेच अपारंपारिक ऊर्जेवर आधारित उद्योग
 - पॉलिमर व रासायनांवर आधारीत उद्योग
 - वस्त्रोद्योग
 - सेवा उद्योग
 

वन संपत्तीवर आधारित उद्योग
- औषधी वनस्पती पासून आयुर्वेदिक औषधे तयार करणे
 - लाकडा पासून फोटो फ्रेम तयार करणे
 - डिंक तयार करणे
 - बांबू प्रक्रिया उद्योग
 - टोपल्या तयार करणे
 - मधमाशी पालन
 - झाडू तयार करणे
 

कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग
- बेकरी उत्पादने
 - दुग्ध प्रक्रिया उद्योग
 - मिठाई तयार करणे
 - बेदाना प्रक्रिया उद्योग
 - पशु खाद्य उद्योग
 - नारळ व सुपारी उत्पादने
 - दलिया तयार करणे
 - फळ प्रक्रिया उद्योग
 - तेल घानी उद्योग
 - मेहंदी तयार करणे
 - गूळ उद्योग
 - बटाटा वेफर्स तयार करणे
 - केळीचे वेफर्स तयार करणे
 - शीतपेय निर्मिती उद्योग
 - रसवंती,उसाचा रस युनिट
 - आईस बॉक्स तयार करणे
 - बाजरी व नाचणी प्रक्रिया उद्योग
 - पिठाची गिरणी,आटा मिल
 - पोहा निर्मिती उद्योग
 - पॉपकॉर्न तयार करणे
 - पापड तयार करणे
 - पाम उत्पादन उद्योग
 - राईस मिल
 - नुडल्स तयार करणे
 - मसाला निर्मिती उद्योग
 - आईस्क्रीम व कुल्फी तयार करणे
 
कागद व धागा उद्योग
- क्वायर उद्योग
 - फायबर उत्पादने
 - पानांपासून द्रोण व पत्रावळी निर्मिती
 - ताग उत्पादने उद्योग
 - वही व रजिस्टर साठी साहित्य निर्मिती
 - पेपर कप उद्योग
 - चटई तयार करणे
 

खनिज संपत्तीवर आधारित जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी
- पाटी,पेन्सिल,फळा,खडू निर्मिती
 - विट भट्टी
 - पेवर ब्लॉक निर्मिती
 - रंग निर्मिती उद्योग
 - गुलाल तयार करणे
 - सिरॅमिक दात तयार करणे
 - कुंभारकाम कुटीर उद्योग
 - प्लॅस्टर ऑफ पॅरिस निर्मिती उद्योग
 - इंधनासाठी ब्रिकेट निर्मिती उद्योग
 - काच निर्मिती उद्योग
 - काचेचे डेकोरेशन व काचेच्या वस्तू तयार करणे
 - बांगड्या निर्मिती उद्योग
 - हिरे कापणे व आकार देणे
 - चुना उत्पादन
 - मूर्ती तयार करणे
 - सोन्याचे दागिने तयार करणे
 - दगडापासून निर्मित इतर उपयोगी वस्तू
 - भांडी घासण्याची पाउडर तयार करणे
 - दगड कापणे उद्योग
 - ग्रॅनाईट दगड कापणी व पॉलिशिंग
 - मातीची भांडी निर्मिती
 - स्टोन क्रशर
 - संगमरवर टाईल्स निर्मिती उद्योग
 - चांदीच्या वस्तू व दागिने निर्मिती
 
पॉलीमर व रसायनांवर आधारीत जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी
- मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय
 - चप्पल बूट बनवण्याचा व्यवसाय
 - रसायन उद्योग
 - माचिस,अगरबत्ती व फटाके उद्योग
 - साबण बनवण्याचा व्यवसाय
 - मच्छर मारण्याचे औषध बनवणे
 - पीव्हीसी पाईप आणि इतर पीव्हीसी उत्पादने
 - पीव्हीसी केबल व इंसुलेटेड तार
 - नायलॉन दोरी तयार करण्याचा व्यवसाय
 - जाळी तयार करणे
 - मेंथोल ऑईल
 - टरपेंटाईन तेल निर्मिती
 - पीव्हीसी संबंधित निर्मिती उद्योग
 - पॉलीबॅग निर्मिती
 - हेअर ऑईल निर्मिती उद्योग
 - प्लास्टिक पॅकिंग वस्तू निर्मिती
 - शाम्पू बनवणे
 - रबर पासून निर्मित उत्पादने
 - सुगंधित तेल निर्मिती
 - टिकल्या तयार करण्याचा व्यवसाय
 - कातडी संबंधित उद्योग
 - डिटर्जेंट व वॉशिंग पावडर व्यवसाय
 

ग्रामीण अभियांत्रिकी तसेच अपारंपारिक ऊर्जेवर आधारीत जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी
- ऑटोमोबाईल वर्क
 - लोहारकाम संबंधित उद्योग
 - सुतारकाम संबंधित उद्योग
 - फर्निचर बनविण्याचा व्यवसाय
 - कॉम्प्युटर असेंबलिंग
 - इंजिनीअरिंग वर्कशॉप
 - इंजिनीअरिंग वर्क
 - फेब्रिकेशन वर्क
 - धातू युनिट
 - लोखंडी ग्रील बनवण्याचा व्यवसाय
 - लोखंड उद्योग
 - वाद्य यंत्रे निर्मिती उद्योग
 - पितळ्याची भांडी निर्मिती उद्योग
 - ॲल्युमिनियमची भांडी निर्मिती उद्योग
 - स्टील ग्रील निर्मिती उद्योग
 - स्टोरेज बॅटरी निर्मिती
 - बॉल बेरिंग निर्मिती
 - वजनकाटा निर्मिती उद्योग
 - मिक्सर ग्राईंडर व इतर घरगुती वस्तू निर्मिती
 - विविध मशिनरी स्पेअर पार्ट निर्मिती उद्योग
 - इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्मिती
 - घड्याळे निर्मिती उद्योग
 - LED बल्ब निर्मिती उद्योग
 - धुपबत्ती पॅकिंग उद्योग
 - कंपाऊंड तार निर्मिती उद्योग
 - कुलर बनवण्याचा व्यवसाय
 - माईक्रोस्कोप निर्मिती उद्योग
 - आरसे व भेटवस्तू बनवण्याचा व्यवसाय
 - लाकडी वस्तू निर्मिती उद्योग
 - कंपाऊंड जाळी निर्मिती उद्योग
 - वेल्डिंग वर्क
 - छत्री जोडण्याचा व्यवसाय
 - पेट्या व सुटकेस बनवण्याचा व्यवसाय
 - इलेक्ट्रिक मोटर निर्मिती उद्योग
 - थ्रेशर मशीन युनिट
 - शेगडी व स्टोव्ह बनवण्याचा व्यवसाय
 - सोलर चलित उपकरणे निर्मिती उद्योग
 - सॉ मिल
 - स्टेबिलाईजर निर्मिती उद्योग
 - मोटर रिवाईंडिंग
 - ट्रॅक्टर ट्रॉली निर्मिती उद्योग
 - कुलूप बनवण्याचा व्यवसाय
 - शिलाई मशिन व पार्ट बनवण्याचा व्यवसाय
 
सेवा व वस्त्रोद्योग
- केस कापण्याचे दुकान
 - रिक्षा सर्व्हिस सेंटर
 - गाड्यांचे ग्रिसिंग करणे
 - दुचाकी दुरुस्ती
 - सोफा रीपेरींग
 - डेंटिंग, पेंटिंग
 - बुक बायडिंग
 - ऑफसेट प्रिंटिंग
 - इव्हेंट मॅनेजमेंट
 - हॉटेल,खानावळ,चहाचे दुकान,स्नॅक्स सेंटर
 - ब्युटी पार्लर
 - जेंट्स पार्लर
 - मसाज सेंटर
 - झेरॉक्स
 - महा ई सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे
 - लौंड्री व्यवसाय
 - टेलरिंग
 - दवाखाना
 - लॅब
 - डीटीपी जॉब वर्क
 - कौशल्य विकास क्लास चालवणे
 - फोटो स्टुडिओ
 - अकाउंटिंग जॉब वर्क
 - मंडप डेकोरेशन
 - मिरची कांडप
 - ड्रायव्हिंग स्कूल
 - PUC सेंटर
 

ट्रॅक्टर चलित प्रत्येक अवजारावर किती अनुदान आहे ते पाहण्यासाठी क्लिक करा .
उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम ( जिल्हास्तरीय योजना अंतर्गत )
जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी
जिल्हा उद्योग केंद्र मध्ये उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्याचपैकी एक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम ही योजना राबविली जाते. त्यामध्ये विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारास प्रवृत्त करण्यासाठी त्यांना उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. लहान प्रमाणात उद्योग व व्यवसाय करताना उद्योजकास अनेक लहान मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण घेतल्याने येणाऱ्या अडचणींची माहिती अगोदरच मिळाल्याने अडचणींवर मात करणे सोपे होते.व उद्योजक उद्योग उभारण्यास सक्षम होतो. प्रशिक्षणाद्वारे उद्योजकाला उद्योग उभारून तो चालवण्यासाठी तयार केले जाते. त्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. हा प्रशिक्षण कार्यक्रम 12 दिवसांचा निवासी व भोजन व्यवस्था असणारा असतो. त्याच प्रमाणे उद्योजकता परिचय कार्यक्रम ( 1 दिवसीय व अनिवासी ), तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (15 दिवस ते 2 महिने अनिवासी ) स्वरूपाचा असतो.
जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी तील व्यवसायांचे तांत्रिक शिक्षण व उद्योजकतेचे प्रशिक्षण उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी मधील प्रशिक्षण पुढील व्यवसायांवर दिले जाते.
तांत्रिक प्रशिक्षणासाठी जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी
- फॅशन डिझायनिंग व विणकाम
 - फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग
 - बेकरी
 - केटरिंग व इतर व्यवसाय
 - मल्टीपर्पज मेकॅनिक्स
 - दुचाकी वाहन दुरुस्ती
 - ब्युटी पार्लर
 - बंदिस्त शेळी पालन
 - शिवणकाम
 - फळ प्रक्रिया
 - घरगुती उपकरणे दुरुस्ती व देखभाल
 - नर्सरी मॅनेजमेंट
 - आयुर्वेदिक वनस्पती लागवड व प्रक्रिया
 - संगणक जोडणी, दुरुस्ती व देखभाल
 - डीटीपी आणि स्क्रीन प्रिंटिंग
 - इतर उद्योग/सेवा उद्योग ( कार्यबल समितीने ठरविलेले )
 
जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी मध्ये पुढील व्यवसायांचा समावेश होत नाही.
पान, तंबाखू, गुटखा व मद्याशी संबंधित उद्योग पशुपालन, वराहपालन, शेती लागवड, वाहन व्यवसाय, रिक्षा, टेम्पो या व्यवसायांना तसेच पर्यावरणासाठी घातक असलेल्या कोणत्याही उद्योग, व्यवसायाकरिता पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजनेतून लाभ दिला जात नाही.
			









शिक्रापूर या ठिकाणी कौशल्य विकास कार्यक्रम व ब्युटी पार्लर फॅशन डिझाईन यासारखे प्रशिक्षण हवं आहे खुप गरज आहे महिलाना जिल्हाच्या ठिकाणी येऊन हे क्लास करणे शक्य होणार नाही.
सर, मला उद्योजक बनायचं आहे. रोजगार मागणारा नव्हे, रोजगार देणारा व्हायचं आहे. पण मला माहिती मिळत नाहीये. मी आशा करतो की मी तुम्हाला येऊन प्रादेशिक कार्यालयामध्ये भेटू शकतो.
मला ड्रिंकिंग वाटर बोटल चा production युनिट सुरु करायचे आहे. सर्व ऑटोमॅटिक मशीन असेल. लागणारे भांडवल साधारण 2 करोड आहे. यासाठी कोणत्या योजना अंतर्गत करू शकतो
मला ड्रिंकिंग वाटर बोटल चा production युनिट सुरु करायचे आहे. सर्व ऑटोमॅटिक मशीन असेल. लागणारे भांडवल साधारण 2 करोड आहे. यासाठी कोणत्या योजना अंतर्गत करू शकतो
सर, मला उद्योजक बनायचं आहे. रोजगार मागणारा नव्हे, रोजगार देणारा व्हायचं आहे. पण मला माहिती मिळत नाहीये. मी आशा करतो की मी तुम्हाला येऊन प्रादेशिक कार्यालयामध्ये भेटू शकतो.
मैं मसाला व्यवसाय शुरू करना चाहता हूं।
9130952064
सर मला मसाला लोणचं पीठ गिरणी बंदिस्त शेळीपालन हे व्यवसाय करायचे आहे भांडवल आणि प्रशिक्षण कुठे मिळेल माहिती द्यावी
sir mala water minnal bottal panyacha yavasay sur karcha machin kute kiti kharch lagel mahiti nahi set kiti lakha part milel sarv mahit pahijet
सर मला रिक्षा सर्विस टेन्शन चालू करायचा आहे भांडवल पाहिजे वर्कशॉप स्पेअर पार्ट रिपेरिंग पूर्ण
रिक्षा थ्री व्हीलर रिपेरिंग स्पेअर पार्ट त्यासाठी मला लोन पाहिजे