घरगुती व्यवसाय यादी 

Table of Contents

घरगुती व्यवसाय यादी पाहण्याअगोदर आपण हे समजून घेऊ की घरगुती व्यवसाय म्हणजे काय. आणि कोणकोण घरगुती व्यवसाय करू शकतात. आजच्या युगात दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली असताना,आपले उत्पन्न मात्र वाढत नाही. काटकसरीने दिवस काढावे लागतात. एका कुटुंबाचा घरगाडा चालवताना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दवाखान्याचा खर्च, यांसारखे खर्च करावे लागतात.सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कमवणारी व्यक्ती एकच असते आणि तिच्यावर कुटुंबातील इतर सदस्य अवलंबून असतात. त्यामुळे कमवणारी एक व खर्च करणारे अनेक अशी परिस्थिती निर्माण होते. कुटुंबातील सर्व लोकांना आपले उत्पन्न वाढवायचे असेल तर ते  घरगुती व्यवसाय यादी मधील एखादा व्यवसाय करू शकतात.

वाढती बेरोजगारी, वाढती महागाई यावर मात करण्यासाठी एखादा घरगुती व्यवसाय करणे व आपले आर्थिक उत्पन्न वाढविणे एक चांगला पर्याय असू शकतो. आपले उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती व्यवसाय आपण करू शकतो. त्याची माहिती घरगुती व्यवसाय यादी या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.घरगुती व्यवसाय यादी मधील व्यवसाय निवडून तो चालू केल्यावर आपले उत्पन्न वाढणारच आहे. त्याशिवाय इतरही फायदे होणार आहेत. जसे की कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करता येतो. त्यासाठी जागाही कमी लागते, दुकान भाड्याने किंवा विकत घेण्याचा खर्च वाचतो, येण्या जाण्या मध्ये होणारा वाहतूक खर्च आणि वेळही वाचतो.

घरगुती व्यवसाय यादी मधून व्यवसाय निवडताना आपले शिक्षण, आपल्या हातामध्ये असणारे कौशल्य, आपली आवड, आपल्याकडे उपलब्ध असणारी साधने याचा विचार करायला हवा तसेच बाजारामध्ये असणारी एखाद्या वस्तू आणि सेवांची मागणी ही लक्षात घ्यायला हवी.गृहिणी, शिक्षण पूर्ण केलेले तरुण तरुणी, रिटायर्ड झालेल्या व्यक्ती तसेच ज्यांना बाहेर जाऊन उद्योग धंदा करणे शक्य नाही. असे लोक घरगुती व्यवसाय यादी मधून व्यवसाय निवडू शकतात. महिलांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आणि निवृत्त व्यक्तिंपासून ते बेरोजगार तरुणांपर्यंत सर्वच घरबसल्या व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात.

जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी पहा , क्लिक करा .

आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन पद्धतीने अनेक व्यवसाय करता येतात. कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम करून अनेक लोकांनी घरबसल्या काम केले, कॉम्प्युटर व इंटरनेट चा वापर करून आपल्या सेवा त्यांनी पुरवल्या त्याचप्रमाणे, डिजिटल मार्केटिंग व ऑनलाईन पद्धतीने आपली उत्पादने आणि सेवा विकून घरबसल्या व्यवसाय करता येऊ शकतो. भारतात इंटरनेटचा वेगाने प्रसार होत आहे. तसेच भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहीम, स्टार्टअप इंडिया मुळे ग्रामीण भागापर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचलेली आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या व्यवसाय करण्यासाठी चालना मिळाली आहे.

  घरगुती व्यवसाय यादी मध्ये ऑनलाईन पद्धतीने करता येणारे व ऑफलाईन पद्धतीने करता येणारे दोन्ही प्रकारचे व्यवसाय सुचवलेले आहेत. तसेच काही व्यवसाय कृषी पूरक असून ते ग्रामीण भागात करता येतील. तर काही व्यवसाय शहरी भागातूनही करता येतील.

घरगुती व्यवसाय यादी  व माहिती

ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी घरगुती व्यवसाय यादी –

घरगुती व्यवसाय यादी

1 अ‍ॅफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

अ‍ॅफिलिएट मार्केटिंग हे असे काम आहे. जे कोणत्याही ठिकाणावरून करता येत आणि उत्पन्न मिळवता येत. एखाद्या कंपनीचे उत्पादन किंवा सेवा लोकांना सुचविल्या जातात. म्हणजेच त्या वस्तूचे मार्केटिंग केले जाते, ग्राहक तुम्ही पुरवलेली लिंक वापरून प्रॉडक्ट खरेदी करतात. आणि खरेदी केलेल्या वस्तूच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम तुम्हाला कमिशन स्वरूपात दिली जाते.Amazon,Flipkart,Meesho सारख्या कंपन्यांच्या Affiliate program मध्ये सामील होऊन प्रोडक्टची लिंक तयार करून ती शेअर करता येईल, लिंक शेअर करताना आपली ब्लॉगिंग वेबसाईट, यूट्यूब चॅनल आणि इतर सोशल मीडिया साईटचा वापर करून आपण घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतो.

2 कंटेंट क्रिएशन (Content Creations)

कंटेंट क्रिएशन म्हणजे मनोरंजक किंवा उपयुक्त माहिती तयार करणे, ज्यामध्ये आपले विशेष ज्ञान, सामान्य ज्ञान,विचार, अनुभव, प्रेरणादायक माहिती त्याचप्रमाणे विनोद, मनोरंजन यासारख्या विषयांवर लेख, फोटो, व्हिडिओ, ऑडियो या स्वरूपात महिती तयार करून ब्लॉग वेबसाईट,यूट्यूब, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांचा वापर करून लोकांना ऑनलाइन पद्धतीने सादर करणे. ब्लॉग, यूट्यूब मॉनिटाईज करून व इंस्टाग्राम वर आपल्या चाहत्यांपर्यंत माहिती पोहचवून आपण चांगले पैसे कमवू शकता.

3 ब्लॉगिंग (Blogging)  

जर आपल्याला एखाद्या विषयाचे विशेष ज्ञान असेल तर ते लेखाच्या स्वरूपात लिहून आपल्या वेबसाईटवर प्रकाशित करू शकता. विविध विषयांवरील लेख जसे की रेसिपी, डाएट, फिटनेस, आरोग्य, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी, वैयक्तिक विचार, प्रवास वर्णने, ताज्या बातम्या, ज्ञानवर्धक महिती,महान व्यक्तींचे विचार,त्यांचे जिवनचरित्र , महत्त्वाचे सल्ले यावरती महितीपूर्ण लेख लिहून ते ब्लॉगिंग वेबसाईटवर नियमितपणे प्रकाशित करू शकता. आपल्या लेखांवरती गूगल जाहिराती दाखवते त्याबदल्यात आपल्याला पैसे मिळतात, तसेच अ‍ॅफिलिएट मार्केटिंग करूनही पैसे मिळतात.

4 व्हिडिओ एडिटिंग (Video Editing)

व्हिडिओ एडिटिंग चे स्किल तुमच्या जवळ असेल तर तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता. एखाद्या व्हिडिओ मध्ये माहिती व मजकूर जोडून, इफेक्ट्स देऊन व संगीत जोडून आकर्षक व्हिडिओ तयार केले जातात. व्हिडिओ एडिटिंगसाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. पण तुमच्याजवळ कॉम्प्युटर नसेल तर मोबाईलने सुध्दा आपण व्हिडिओ एडिटिंग करू शकतो. विशिष्ठ कार्यक्रम, लग्न सोहळा ड्रोन व्ह्यू यांचे व्हिडिओ तयार करून व एडिट करुन आपण सेवा देऊ शकतो. माहितीपूर्ण आणि मनोरंजक व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर अपलोड करूनही पैसे कमवता येतात. तसेच Upwork,Freelancer, Fiverr या वेबसाईटवरून हि व्हिडिओ एडिटिंग ची कामे घेऊन घरबसल्या व्यवसाय करू शकता.

5 ग्राफिक डिझायनिंग (Graphic Designing)

सोशल मीडिया पोस्ट, लोगो डिझायनिंग, पोस्टर आणि बॅनर तयार करणे, जाहिराती तयार करणे, पॅकेजिंग डिझाईन करणे, आणि वेबसाइट किंवा यूट्यूबसाठी थंबनेल तयार करणे यासाठी ग्राफिक डिझायनिंग चा वापर केला जातो.Canva,Adobe Photoshop, Adobe illustrator या सॉफ्टवेअरचा वापर करून आपण ग्राफिक डिझायनिंग करू शकतो.

6 डेटा एन्ट्री (Data Entry)  

आपल्याला कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान आणि टायपिंगचे काम जमत असेल तर घरबसल्या आपण डेटा एन्ट्रीचे काम करू शकता. यामध्ये कागदावरील माहिती कॉम्प्युटर मध्ये अचूकपणे डिजिटल स्वरूपात सेव केली जाते.Google Sheet,Excel,Word मध्ये टायपिंग करणे, फॉर्म भरणे, कॉपी पेस्ट करणे, तसेच ग्राहकांची माहिती विशिष्ट रकान्यात भरणे, बिझनेस रिपोर्ट तयार करणे. ही कामे केली जातात घरबसल्या काम मिळवण्यासाठी Upwork,Freelancer,Fiverr या वेबसाईटवर प्रोफाइल तयार करून काम करू शकता.

7 वस्तूंची ऑनलाइन विक्री ( E-Commerce)

 घरगुती व्यवसाय यादी मधील वस्तूंची ऑनलाइन विक्री करणे हा ऑनलाईन व्यवसायामधील लोकप्रिय व्यवसाय आहे. आपण हस्तकलेच्या वस्तू, गरजेच्या वस्तू, खेळणी स्वतः तयार करून किंवा होलसेल दरात विकत घेऊन त्यांची ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री करू शकतो. त्यासाठी एखादी वस्तू कमीत कमी किमतीमध्ये कुठे भेटते का याचा शोध घेऊन जास्त क्वांटिटीमध्ये खरेदी करुन स्वतःच्या नावाने ब्रँड तयार करून त्या वस्तूची विक्री करता येईल.Amazon,Flipkart, Meesho सारख्या कंपन्यांच्या सोबत विक्रेता म्हणून नोंदणी करु शकता.

8 ऑनलाईन क्लासेस (Online Classes)  

सध्या शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेस घेण्याचे प्रमाण वाढत आहे. Zoom किंवा Google Meet द्वारे लाईव्ह क्लासेस घेऊ शकतो, आपला Youtube चॅनल सुरू करून ठराविक विषयावर व्हिडिओ तयार करून अपलोड करू शकतो. हळू हळू क्लासेस घेण्याचे प्रमाण वाढल्यावर त्याला व्यावसायिक स्वरूप देताना स्वतःची वेबसाईट किंवा ॲप देखील चालु करता येईल. नोट्स, टेस्टस्, क्वेस्शन पेपर देण्यासाठी व्हॉट्सॲप चा वापर करता येईल. खालील विषयांवर ऑनलाईन क्लासेस घेता येतील.

शालेय माध्यमिक शिक्षण,MPSC,UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य आधारित कोर्सेस, व्यवसाय व मार्केटिंग सल्ला, योगा क्लासेस, स्पोकन इंग्लिश क्लासेस इत्यादी. ऑनलाईन क्लासेस घेताना यूट्यूब कडून जाहिराती द्वारा आणि सबस्क्रिप्शन बेसिस वर मासिक किंवा वार्षिक फी घेऊन आपण उत्पन्न मिळवू शकतो.

अन्नप्रक्रिया व्यवसाय आधारित घरगुती व्यवसाय यादी 

घरगुती व्यवसाय यादी

आपल्या देशात अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थांचे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे अन्नप्रक्रिया व्यवसायात खूप मोठी संधी आहे. शहरी भागामध्ये बदलत्या जीवनशैलीनुसार खाद्य संस्कृती व परंपरेमध्ये बदल होत आहे, नोकरी करणाऱ्या लोकांना वेळेच्या अभावी स्वतः स्वयंपाक करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना लवकर तयार होणारे, रेडी टू इट अशा पदार्थांची गरज असते. हि गरज ओळखून आपण त्यांना सेवा देऊ शकतो. आणि स्वतः ही घरगुती व्यवसाय चालु करू शकतो. घरगुती व्यवसाय यादी मधील पुढील पैकी अन्न प्रक्रियेवर आधारित व्यवसाय आपण करू शकतो.

9 केक, बिस्कीट व बेकरी प्रोडक्ट

 केक बनवण्याचा व्यवसाय आपण सहजपणे घरबसल्या करू शकतो. आपल्या भागामध्ये योग्य मार्केटिंग केल्यास केकसाठी चांगली मागणी तयार होऊ शकते. त्याच बरोबर बिस्कीट,पाव, टोस्ट सारखे इतर बेकरी उत्पादने ही आपल्याला तयार करून विकता येतील.

10 क्लाउड किचन

क्लाउड किचन हे आधुनिक युगातले लोकप्रिय व्यवसाय मॉडेल आहे. यामध्ये पारंपारिक हॉटेल सारखे जेवायला बसायची सोय असलेले किंवा समोरासमोर खाद्य पदार्थांची खरेदी विक्री न करता. एका किचन मधून अन्न थेट ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते. त्यासाठी ऑनलाईन ॲप्स च्या माध्यमातून ऑर्डर स्विकारून घरपोच डिलिव्हरी केली जाते. आणि ऑनलाईन माध्यमातूनच पैसे दिले जातात. घरबसल्या एक किचन सेटअप तयार करून आपण हा व्यवसाय चालू करू शकतो. आपल्या किचन पासून ग्राहकांपर्यंत जेवण पोहचवण्याचे काम स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्या करतात. या कंपन्यांसोबत करार करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता घरगुती व्यवसाय यादी मधील हा सर्वात चांगला घरगुती व्यवसाय आहे.

घरगुती व्यवसाय यादी मधील अन्नप्रक्रिया व्यवसायामध्ये आपण पुढील व्यवसाय देखील करू शकता.

11 फूड ट्रक 

12 नाश्ता सेंटर 

13 भोजनालय 

14 टिफीन सर्व्हिस 

15 केटरिंग सर्व्हिस 

कृषी प्रक्रिया व्यवसाय

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अन्नधान्य व भाजीपाला पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले जाते. या पिकांवर प्रक्रिया करून व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. शेतमालाचे मुल्यवर्धन झाल्याने फक्त रोजगार निर्मितीच नाही तर शेतकऱ्यालाही फायदा होणार आहे. घरगुती व्यवसाय यादी मधील कृषिप्रक्रिया व्यवसाय पुढीलप्रमाणे.

16 आटा प्लांट 

17 बेसन प्लांट 

18 मसाला उद्योग 

19 लसूण पेस्ट 

20 बटाटा वेफर्स 

21 केळी वेफर्स 

22 पापड उद्योग 

दुग्ध प्रक्रिया व्यवसाय

घरगुती व्यवसाय यादी

आपल्या भागामध्ये दुधाचे उत्पादन घेतले जात असेल आणि स्वतःकडे दुधाळ जनावरे असतील तर आपण दूध प्रक्रिया व्यवसाय करु शकता. आणि इतर शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करुन अनेक व्यवसाय करता येतील. घरगुती व्यवसाय यादी मध्ये घरबसल्या दुधावर प्रक्रिया करून पुढील व्यवसाय करता येतील.

23 लस्सी तयार करणे 

24 कुल्फी तयार करणे 

25 पनीर निर्मिती व्यवसाय 

26 आइस्क्रीम तयार करणे 

27 दही विक्री 

28 देशी तूप तयार करणे 

29 श्रीखंड निर्मिती व्यवसाय 

30 दुध पाउडर निर्मिती व्यवसाय 

कौशल्यावर आधारित व्यवसाय

घरगुती व्यवसाय यादी मधील काही व्यवसाय असे आहेत. ते करण्यासाठी आपल्या हातात काही तरी कौशल्य असायला पाहजे. भारत सरकारच्या स्किल इंडिया मोहीम मधून अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. ते पूर्ण करून आपण व्यवसाय करु शकता.

भारत सरकारच्या Skill India पोर्टल ला भेट देण्यासाठी क्लिक करा .

कौशल्यावर आधारित काही व्यवसाय पुढीलप्रमाणे 

31 दागिने तयार करणे – लोकल मार्केट किंवा ऑनलाईन विक्री

32 मेकअप आर्टिस्ट 

33 ब्युटी पार्लर 

34 जिम ट्रेनर 

35 योगा ट्रेनर 

36 डाएट कन्सल्टंट 

37 हेअर स्टाईलिस्ट 

38 फोटोग्राफी 

39 टेलरिंग 

40 बुककिपिंग सेवा 

41 मोबाईल दुरुस्ती 

42 LED TV दुरूस्ती 

43 इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती 

घरबसल्या करता येणारे इतर व्यवसाय  

44 डे केयर ( पाळणाघर)

45 किराणा दुकान 

46 फुलांचा व्यवसाय 

47 गिफ्ट बास्केट 

48  रोपांची नर्सरी 

49 लॉन्ड्री सर्व्हिस 

50 कार वॉशिंग 

Leave a Comment