घरकुल यादी कशी बघायची,पहा 5 स्टेप्स मध्ये 

घरकुल यादी कशी बघायची हे आपण समजून घेऊ . केंद्र सरकार कडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाला घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते , सुरक्षित निवारा तयार करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी मंजूर करून टप्या टप्प्याने त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.

प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या घरकुल योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही योजना प्रामुख्याने राबविली जाते. शहरी व ग्रामीण भागातील लोकांना घटकांनुसार या योजनेचा लाभ दिला जातो.या अंतर्गत 1.20 लाख इतकी रक्कम दिली जाते. तसेच रोजगार हमी योजनेतून व स्वच्छ भारत मिशन मधून शौचालय बांधण्यासाठी अधिकची रक्कम देण्यात येते.

सरकारकडून आवास योजना राबवताना सर्वप्रथम पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते. जर आपल्याला घरकुल यादी कशी बघायची असा प्रश्न पडला असेल तर हा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल या लेखामध्ये आपण घरकुल यादी कशी बघायची ते पाहणार आहोत.

 सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयातून गाव पातळीवर घरकुल साठी ड यादी तयार केली जाते. व नंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालय कडून लाभार्थ्यांची पात्रता तपासून अंतिम यादी मंजूर केली जाते. व सरकारच्या वेबसाईटवर घरकुल यादी ची माहिती उपलब्ध केली जाते. आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका व गाव निहाय मंजूर घरांची आकडेवारी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे आवास योजना राबवताना पारदर्शकता येते आणि सरकारी यंत्रणेला योजनेचा लाभ देणे सोपे जाते.

घरबसल्या करता येणाऱ्या 50 प्रकारच्या व्यवसायांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.

 शासनाकडून अनेक प्रकारच्या आवास योजना राबवल्या जातात त्यापैकी काही आवास योजना पुढीलप्रमाणे 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 

इंदिरा आवास योजना 

आदिम जमाती आवास योजना 

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण

मोदी आवास घरकुल योजना 

रमाई आवास योजना 

शबरी आवास योजना 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची घरकुल यादी कशी बघायची तसेच वरीलप्रमाणे इतर आवास योजनांची घरकुल यादी कशी बघायची ते आपण थोडक्यात पाहू, कॉम्प्युटर किंवा मोबाइलद्वारे ही आपण यादी पाहू शकता.

आपल्या गावाची घरकुल यादी कशी बघायची

सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या अधिकृत वेबसाईटवरुन घरकुल यादी कशी बघायची ते आपण पुढील 5 स्टेप्स वापरून बघू शकतो.

1 सर्वप्रथम pmayg.nic.in या वेबसाईटवर जायचे आहे.

2 मेनूबार वरील Awasssoft या पर्यायावर क्लिक करून, Report यावर क्लिक करायचे आहे.

3 पुढे अनेक पर्याय असलेले बॉक्स दिसतील त्यामधील F या बॉक्स मधून Beneficiaries registered या पर्यायावर क्लिक करा.

4 स्क्रिन च्या डाव्या बाजूच्या सेक्शन मध्ये राज्य निवडा, जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा हे पर्याय दिसतील त्यामधून आपले ठिकाण निवडायचे आहे.

5 पुढे बेरीज किंवा वजाबाकी गणिताचे उत्तर टाकून sabmit वर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला यादी दिसेल.

वरीलप्रमाणे स्टेप्स वापरून आपण आपल्या गावाची घरकुल यादी पाहू शकता व यादी PDF किंवा Excel फॉरमॅट मध्ये डाऊनलोड देखील करू शकता.

नोंदणी क्रमांक वापरून घरकुल यादी कशी बघायची 

नोंदणी क्रमांक वापरून आपण आपली घरकुल साठीची वैयक्तिक माहिती पाहू शकता त्यामध्ये लाभार्थ्यांची घरकुलची स्थिती पाहता येते, मंजूर रक्कम पाहता येते. वितरित केलेले घरकुलाचे हफ्ते तसेच घरकुलाच्या प्रगतीनुसार वेळोवेळी केलेली तपासणीची माहिती फोटो सहित आपण येथे पाहू शकता. 

पुढील स्टेप्स वापरून तुम्ही वैयक्तिक नोंदणी क्रमांक वापरून घरकुल यादी कशी बघायची ते पाहू शकता.

1 सर्वप्रथम pmayg.nic.in या वेबपोर्टलवर जायचे आहे.

2 मेनुबार वरील stakeholders या पर्यायावर क्लिक करा.

3 त्यानंतर IAY/PMAYG Beneficiary या पर्यायावर क्लिक करा.

4 आपला नोंदणी क्रमांक टाकून कॅप्चा कोड भरायचा आहे.

5 सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याची घरकुल संदर्भातील सर्व डिटेल्स दाखवली जाईल.

( आपला नोंदणी क्रमांक माहीत करून घेण्यासाठी याआधी दाखवलेल्या 5 स्टेप्स फॉलो करून आपल्या संपूर्ण गावाची यादी पाहावी, त्यामध्ये आपले नाव शोधावे, आपल्या नावासमोर आपला नोंदणी क्रमांक दिसेल.)

आपल्या गावाची घरकुल यादी कशी बघायची तसेच नोंदणी क्रमांक वापरून वैयक्तीक तपशील कसा बघायचा ते आपण या लेखामध्ये पाहिले.

जर घरकुल यादी मध्ये आपले नाव नसेल आणि नवीन यादीमध्ये नाव समाविष्ट करायचे असेल तर पुढील माहिती वाचून यादीमध्ये नाव कसे टाकायचे ते आपण पाहू शकता.

नवीन घरकुल यादी मध्ये नाव कसे टाकायचे ?

Awaas Plus App हे भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने विकसित केलेले एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲपचा वापर ग्रामपंचायत स्तरावर घरकुल योजनेसाठी अपात्र राहिलेले किंवा नवीन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी केला जातो.

प्ले स्टोर वरून ऍप्लिकशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांचा अद्यावत डेटा मिळवून नवीन घरकुल यादी तयार केली जाते. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत मधून ज्या लोकांना घरकुलचा लाभ मिळाला नाही. त्यांचे सर्वेक्षण करून यादी मध्ये नाव टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. जेणे करून लाभार्थ्याला लवकरात लवकर लाभ देता यावा. त्यासाठी ग्रामसेवक,ग्रामरोजगार सेवक यांच्या कडून माहिती भरून घेतली जाईल, तसेच लाभार्थी स्वतः Awaas Plus App च्या माध्यमातून सर्वे करून आपली नोंदणी करु शकतात.

कृषी यांत्रिकीकरण योजनेतून कोणत्या ट्रॅक्टर अवजाराला किती अनुदान मिळते ते पाहण्यासाठी आमचा लेख वाचा क्लिक करा.

Leave a Comment