पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय,कमी गुंतवणुकीत सुरू करा हे 11 व्यवसाय

सध्याच्या जगात नोकरी मिळवणे खूप अवघड होत चालले आहे. नोकरी मिळवणे आणि ती टिकवून ठेवणे एक मोठे आव्हान बनत चालले आहे.अनेक पुरुष स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी, कमाईचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठीच पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. घरून काम करणे म्हणजे केवळ महिलांसाठीच आहे हा समज आता पूर्णपणे मागे पडत चालला आहे. कोरोना काळात घरून काम करण्याचा नवीन ट्रेंड चालू झाला होता. 

पुरुषांनाही त्यांच्या कौशल्य आणि आवडीनुसार घरबसल्या अनेक व्यवसाय सुरू करता येतात. ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य तर मिळतेच शिवाय कुटुंबासोबत वेळ मिळतो. पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय सुरू करणे हे फक्त आर्थिक गरजांसाठी नसून स्वतःच्या आवडीचे काम स्वतः करून समाधान मिळवण्याचा एक मार्ग आहे. 

या लेखात आपण पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय या संकल्पनेवर सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर कमी गुंतवणूक करून व्यवसाय कसा सुरू करायचा आणि त्यात यशस्वी कसे व्हायचे त्यासाठी काय करायला पाहिजे तेही आपण येथे पाहणार आहोत. 

घरगुती व्यवसायांचे फायदे 

पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय

पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे तो एक आकर्षक पर्याय ठरतो. 

  • कमी गुंतवणूक – घरून करता येणाऱ्या व्यवसायांना जास्त भांडवलाची आवश्यकता नसते. तुम्ही स्वतःच्या कमी भांडवलातून किंवा छोट्या कर्ज रकमेतून व्यवसायाची सुरुवात करू शकता. दुकान किंवा ऑफिसचे भाडे, येण्या जाण्याचा खर्च यांसारखे इतर खर्च करावे लागत नाहीत. त्यामुळे नफ्यात बचत होते. 
  • कामाचे लवचिक तास – तुम्ही तुमच्या सोयीनुसार कामाचे तास ठरवू शकता.दिवसातील दैनंदिन कामे उरकून ठराविक व्यवसायाच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकता आणि सामाजिक जीवनाचा समतोल राखू शकता. कामासाठी बाहेर जाताना वाया जाणारा प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात. 
  • तुम्हीच स्वतःचे मालक – अनेक लोकांना कुणाच्याही हाताखाली काम करण्याची इच्छा नसते. स्वतःचा व्यवसाय असल्यावर दुसऱ्याकडे काम करण्याची गरज राहत नाही. तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकता तसेच व्यवसायाच्या नफा तोट्याला तुम्ही स्वतः जबाबदार असल्याने कामावर तुमचे पूर्ण नियंत्रण असते. व्यवसायातील यश आणि अपयशाची जबाबदारी तुमची असल्याने तुम्ही अधिक आत्मविश्वासाने काम करू शकता. 
  • कौशल्याचा विकास – तुमच्या जवळ असलेल्या कौशल्यांचा पुरेपूर फायदा तुम्हालाच मिळतो. आणि व्यवसाय जसा जसा वाढत जाईल तसे तसे  तुम्ही नवनवीन कौशल्ये आत्मसात करू शकता. त्यामुळे तुमचा वैयक्तिक आणि व्यवसायिक विकास होईल. मार्केटिंग, फायनान्स, ग्राहक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला अनुभव भेटत जाईल.

50 घरगुती व्यवसायांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.

तुम्ही जर नोकरी करत असाल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल. तर सुरुवातीला कमी गुंतवणुकीचे व्यवसाय निवडणे सर्वात योग्य राहील. हा पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. 

कमी गुंतवणुकीतून सुरू करता येणारे व्यवसाय –

 डिजिटल सेवा

पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय

1 ब्लॉगिंग आणि कंटेंट रायटिंग –

तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता. प्रवास वर्णन, आर्थिक नियोजन, खेळ, आरोग्य, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, बातम्या या विषयावर तुम्ही सविस्तर लेख लिहून ब्लॉगिंग करू शकता. यामध्ये तुमची आवड आणि ज्ञान कोणत्या क्षेत्रामध्ये आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे. ब्लॉग लेख वर जाहिराती दाखवून व Affiliate Marketing किंवा प्रायोजित पोस्ट तयार करून पैसे कमवू शकता. स्वतः ब्लॉग नसेल चालू करायचा तर इतर अनेक कंपन्या आपल्या वेबसाईटवर लेख लिहिण्यासाठी किंवा सोशल मीडिया मार्केटिंग साठी लेखकांच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी फ्रीलान्सिंग द्वारा तुम्ही घरी बसून कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता. 

2 सोशल मीडिया मॅनेजमेंट –

अनेक व्यावसायिक आणि उद्योजक यांना त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत हवी असते. अशा वेळेस त्यांच्या जाहिरातीसाठी तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट्स, कमेंट्स करून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करु शकता,नवनवीन ट्रेंड्स वापरून तुम्ही जाहिरातींचे व्यवस्थापन करू शकता आणि पैसे कमवू शकता. हा एक चांगला पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय आहे. 

3 ग्राफिक डिझाईनिंग –

जर तुम्ही कला क्षेत्रातील असाल किंवा कलेची आवड असेल. तर तुम्ही ऑनलाईन साधनांचा वापर करून आकर्षक ग्राफिक्स, लोगो आणि पोस्ट्स तयार करू शकता. यासाठी canva सारख्या एप्लीकेशन आणि वेबसाईट टूलचा वापर करून कंटेंट तयार करता येईल. आणि फ्रीलान्सिंग वेबसाईटवर तुमचा पोर्टफोलिओ तयार करून तुम्ही सेवा देऊ शकता. सुरुवातीला लहान व्यवसायांपासून सुरुवात करावी लागेल.

कौशल्य आधारित व्यवसाय 

पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय

4 ऑनलाइन कोचिंग आणि ट्युशन –

तुम्हाला गणित, विज्ञान मधील कोणत्याही विषयाचे विशिष्ट ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन ट्युशन सुरू करू शकता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकता, त्याचबरोबर योगा ट्रेनर किंवा फिटनेस ट्रेनर म्हणून देखील ऑनलाइन क्लासेस घेऊ शकता. हा व्यवसाय पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय म्हणून एक चांगली संधी आहे. कारण यात कमीत कमी खर्च लागतो.

5 क्राफ्ट आणि हस्तकला –

अनेक पुरुष मंडळींना लाकडी काम, चामड्याच्या वस्तू, धातू काम किंवा इतर हस्तकलेच्या वस्तू बनवण्याचा छंद असतो. बांबू पासून उपयोगी वस्तू, तागापासून बनवलेल्या वस्तू, मूर्ती निर्मिती, मातीची भांडी, कुल्हड निर्मिती (माती पासुन चहाचा कप) यांसारख्या वस्तू ते बनवून विकू शकतात. काही वस्तू ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील सोशल मीडिया द्वारा मार्केटिंग करून विकू शकता.

मध्यम गुंतवणुकीचे व्यवसाय 

जर तुमच्याकडे थोडी अधिक गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर तुम्ही पुढील व्यवसायांचा विचार करू शकता. हे सुद्धा चांगल्या प्रकारचे पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय आहेत. 

ई-कॉमर्स आणि ऑनलाईन विक्री 

6 ड्रॉपशिपिंग (Dropshipping) –

ड्रॉप शिपिंग व्यवसाय हा एक लोकप्रिय व्यवसाय प्रकार आहे. जिथे तुम्हाला उत्पादने स्वतःकडे साठवून ठेवण्याची गरज नसते. तुम्ही ऑनलाईन स्टोअर सुरू करता आणि जेव्हा ग्राहक ऑर्डर देतो तेव्हा तुम्ही त्यांची ती ऑर्डर थेट पुरवठादाराकडे पाठवता. पुरवठादार ती वस्तू थेट ग्राहकाकडे पाठवतो. यात तुमचा नफा हा खरेदी आणि विक्रीच्या किमतीतील फरक असतो. 

7 घरगुती उत्पादनांची विक्री –

घरामध्ये तयार करता येणारी उत्पादने जसे की मसाले, लोणचे, पापड, जॅम यांसारखे खाद्यपदार्थ जर तुम्हाला चांगल्या प्रकारे बनवता येत असतील तर तुम्ही ते तुमच्या परिसरातील दुकानांमध्ये विकू शकता. या प्रकारचा व्यवसाय छोट्या पासून सुरुवात करून तो हळूहळू मोठा करू शकता. आणि स्वतःचा ब्रँड तयार करून स्वतःची ओळख निर्माण करू शकता. हा व्यवसाय पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय म्हणून सुरू करता येऊ शकतो. 

8 पूनर्विक्री व्यवसाय – ( Reselling Business) –

तुम्ही इतर लोकांनी वापरलेल्या जुन्या वस्तू जसे की इलेक्ट्रिक वस्तू, फर्निचर सामान, वाहने, दुर्मिळ वस्तू कमीत कमी किमतीमध्ये खरेदी करून त्यांची साफसफाई व दुरुस्ती करून जास्त किमतीमध्ये विकू शकता यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येणारा हा एक चांगला पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय आहे. 

सेवा आधारित व्यवसाय 

9 वेबसाईट डेव्हलपमेंट –

तुम्ही सध्या हा लेख एका वेबसाईटवर वाचत आहात. याच प्रकारे वेगवेगळ्या विषयांवर इतरांच्या व्यवसायासाठी तुम्ही वेबसाईट तयार करून पैसे कमवू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंट करण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये शिकावी लागतील. यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिकण्यासाठी अनेक कोर्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आवश्यक कौशल्य आत्मसात करून वेबसाईट डेव्हलपमेंट करणे हा सर्वात चांगला पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय आहे. वर्डप्रेस सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तसेच इतर आवश्यक ऑनलाईन टूल्स वापरून तुम्ही वेबसाईट तयार करू शकता आणि फ्रीलान्सिंग द्वारा ऑनलाईन कामे घेऊ शकता. 

10 व्हिडिओ एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हर –

फ्रीलान्सिंगने पैसे कमावण्याचा अजून एक चांगला पर्याय म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हर, लहान मोठे व्यवसाय आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी,मार्केटिंग करण्यासाठी इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी करतात. व्हिडिओ एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हर चे स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग वेबसाईट वरून कामे घेऊ शकता. फ्रीलान्सिंग हे असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ज्या द्वारा लहान मोठे व्यवसाय करणारे आपली कामे दुसऱ्यांकडून करवून घेण्यासाठी पैसे देतात. यामध्ये आपल्याकडे जेवढे जास्त कौशल्ये असतील तेवढ्या जास्त प्रमाणात आपण याद्वारा पैसे कमवू शकता. तसेच आपण आपले स्वतः तयार केलेले व्हिडिओ एडिटिंग करून ते युट्युब वर अपलोड करून हि पैसे कमवू शकता.

11 घरगुती केटरिंग आणि टिफिन सेवा

आजच्या धावपळीच्या जीवनात, नोकरदार व्यक्ती, विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना स्वतःसाठी स्वयंपाक करायला वेळ मिळत नाही. खास करून शहरी भागातील ही मोठी गरज लक्षात घेऊन, तुम्ही घरगुती टिफिन सेवा सुरू करू शकता. यामुळे लोकांना वेळेवर आणि घरगुती चवीचं जेवण मिळेल. तसेच लहान कार्यक्रम,समारंभ यासाठी लागणाऱ्या जेवणासाठी केटरिंग सेवा देऊन तुम्ही व्यवसाय करू शकता. हा एक पारंपारिक आणि फायदेशीर असा पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय आहे.Swiggy,Zomato सारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांसोबत करार करून तुम्ही तुमचे जेवण ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवून अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकता.

पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय

व्यवसायासंबंधीत अधिक माहिती मिळवण्यासाठी भारत सरकारने चालवलेल्या वेबसाईट वर जाण्यासाठी क्लिक करा .

पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी 

कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन आणि दूरदृष्टीची आवश्यकता असते. पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय सुरू करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

  • योग्य कौशल्याची निवड – सर्वात आधी तुम्हाला कोणत्या गोष्टी मध्ये आवड आहे. आणि तुमच्या मध्ये कोणती कौशल्ये आहेत ते ओळखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या कामात चांगले आहात, तुम्हाला काय करायला आवडते जे बाजारपेठेमध्ये विकले जाऊ शकते ते ओळखूनच योग्य व्यवसायाची निवड करावी. 
  • बाजारपेठेचे संशोधन (Market Research) – तुम्ही निवडलेल्या व्यवसायाची बाजारात किती मागणी आहे ते तपासा, तुमच्या प्रतिस्पर्ताकांचा अभ्यास करा आणि तुमच्या उत्पादनात किंवा सेवेत असे काय खास आहे ज्यामुळे ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील याचा विचार करा. 
  • व्यवसाय योजना तयार करणे – भलेही तुमचा व्यवसाय छोटा असेल तरी पण एक साधी योजना तयार करा. यात तुमच्या उत्पादन किंवा सेवेची बाजारातील मागणी, तुमच्याकडे उपलब्ध असलेले भांडवल, व्यवसायासाठी आवश्यक असणारी गुंतवणूक, आवश्यकता भासल्यास लागणारे कर्ज. अपेक्षित नफा, ग्राहकांची ओळख व त्यांची मानसिकता तसेच मार्केटिंग कशी करणार हे तुमच्या योजनेमध्ये नमूद करा. 
  • ऑनलाइन उपस्थिती – आजच्या डिजिटल युगात तुमच्या व्यवसायाची ऑनलाइन उपस्थिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सोशल मीडिया जसे की Facebook आणि Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर पेजेस तयार करू शकता. किंवा एक छोटी वेबसाईट बनवू शकता. 
  • स्वतःची जाहिरात करा – तुमच्या कामाबद्दल इतरांना सांगा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना तुमच्या व्यवसायाची माहिती द्या आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहा. 
  • उत्पादनाची गुणवत्ता – तुमचे उत्पादन किंवा सेवेची गुणवत्ता उत्कृष्ट ठेवा. चांगल्या गुणवत्तेमुळे ग्राहक तुमच्याकडे पुन्हा येतील आणि इतरांनाही तुमच्याबद्दल सांगतील. 
  • ग्राहकांशी चांगले संबंध – तुमच्या ग्राहकांशी नम्रपणे वागा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि त्यांच्या सूचनांचा विचार करा. 
  • सतत शिकत रहा – तुमच्या व्यवसायाशी संबंधित नवीन गोष्टी, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची अपडेट रहा, ऑनलाइन कोर्सेस, वेबिनार आणि कार्यशाळेमध्ये सहभाग घ्या.

जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी पाहण्यासाठी क्लिक करा .

पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय सुरू करणे हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. योग्य नियोजन, कमी गुंतवणूक आणि कठोर मेहनतीने तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय यशस्वी करू शकता. यामुळे तुम्हाला केवळ आर्थिक स्वातंत्र्यच मिळणार नाही, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू शकाल. आजच्या जगात तुम्ही कोणत्याही ठिकाणी बसून जगातील कोणत्याही ग्राहकाला तुमची सेवा देऊ शकता. त्यामुळे, तुमच्यातील उद्योजकाला जागे करा आणि आजच तुमच्या आवडीच्या व्यवसायाची सुरुवात करा. हा लेख तुम्हाला पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय निवडण्यात नक्कीच मदत करेल.

Leave a Comment