अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाने 27-11-1998 ला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली. आर्थिक मागास असलेल्या घटकांतील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याज दराने आणि व्याजाची परतफेड करताना सुविधा देऊन कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे कोणकोणती लागतात ते आपण येथे पाहणार आहोत. 

महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण तरुणींना दिला जातो. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांच्या आवडीनुसार स्वयंरोजगाराची निवड करून त्यांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणे. स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे. तसेच राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी कर्ज योजनांची पारदर्शी व प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शासनाचे उद्दिष्ट आहे.

कर्ज योजना राबवताना केवळ उद्दिष्टांपुरते मर्यादित न राहता आर्थिकदृष्ट्या मागास बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन. लाभार्थ्याला प्रत्यक्षपणे लाभ कसा होईल व भविष्यामध्ये व्यवसाय कसा टिकून राहिल याची शाश्वती महामंडळाकडून घेतली जाते. लाभार्थ्याने निवडलेल्या व्यवसायाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने व जलद गतीने होण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार आहे.

स्वयंरोजगारासाठी कर्ज घेण्यास इच्छूक उमेदवार अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे गोळा करून शासनाने विकसित केलेल्या महामंडळाच्या स्वयंरोजगार वेबपोर्टल वर अर्ज करू शकतात. “महास्वयम” या पोर्टल वर कर्जासाठी कोणकोणत्या योजना राबविल्या जातात, त्यांची पात्रता, अटी शर्ती, कर्जाची मंजुरी प्रक्रिया इत्यादी माहिती यावर देण्यात आलेली आहे. तसेच लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे कोणकोणती लागतात याची माहिती देण्यात आलेली आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी क्लिक करा. 

स्वयंरोजगारासाठी इच्छूक उमेदवार वरील लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरू शकतात. काही बेरोजगार तरुणांना कोणता व्यवसाय करावा कोणता नाही. याची माहिती नसल्याने स्वयंरोजगारासाठी निर्णय घेता येत नाही. त्यासाठी आपल्या पात्रतेनुसार योग्य तो रोजगार शोधण्यासाठी पोर्टल वर सुविधा देण्यात आली आहे. जेणे करुन बेरोजगार तरुण व्यवसायाची निवड करून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे मध्ये प्रकल्प अहवाल हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करताना बँकेला प्रकल्प अहवाल सादर करणे बंधनकारक असते. महास्वयम या संकेतस्थळावर व्यवसायांचे नमुना प्रकल्प उपलब्ध आहेत.

आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ते अर्जाची स्थिती पाहू शकतात,कर्जाची परतफेड करण्याची स्थिती पाहू शकतात तसेच काही अडचणी आल्यास हेल्पलाईनची सुविधा देखील देण्यात आली आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे व माहिती 

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मराठा समाजातील बेरोजगारांसाठी प्रामुख्याने पुढील योजना राबविल्या जातात.

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1)
  • गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-2)
  • गट प्रकल्प कर्ज योजना (GL-1)

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती व अर्ज प्रक्रिया 

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. पुरुष उमेदवार असतील तर वयाची अट जास्तीत जास्त 50 वर्ष पर्यंत आणि महिला उमेदवार असेल तर जास्तीत जास्त 55 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी वेब पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक उमेदवाराने या महामंडळाच्या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळ फक्त मराठा समाजातील उमेदवारांसाठी कार्यरत असून इतर जाती किंवा गटातील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नॉन क्रिमिलयेरच्या मर्यादेत किंवा वैयक्तिक ITR (पती व पत्नीचे) प्रमाणे वार्षिक सकल उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. निव्वळ उत्पन्न ग्राह्य धरले जाणार नाही. ( 8 लाख रुपयांच्या मर्यादेतील सक्षम प्राधीकाऱ्याचे प्रमाणपत्र )
  • एकाच कुटूंबातील रक्त नाते संबंधातील व्यक्ती कर्जा करीता सह कर्जदार राहीले असतील तर या योजनेतून मंजुरी दिली जाईल पण अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असणे आवश्यक असेल.
  • CBS प्रणालीयुक्त व स्थानिक क्षेत्रात कार्यरत बँके कडूनच कर्ज घेणे या योजनेअंतर्गत अनिवार्य आहे.
  • या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तिही घेऊ शकतात, दिव्यांग व्यक्ति हा व्यवसाय करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवा. योजनेतून एकूण निधीच्या 4 टक्के निधी हा महामंडळाकडून दिव्यांगासाठी राखीव ठेवला जातो.
  • महामंडळाच्या योजनेचा लाभ 5 वर्षाकरीता किंवा त्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्जासाठी लागू राहील.
  • या योजनेमधून जास्तीत जास्त 10 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कर्ज दिले जात असून व्याज परताव्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 5 वर्ष इतका राहील तर जास्तीत जास्त 12% इतका व्याजाचा दर राहील 12% व्याजानुसार जास्तीत जास्त 3 लाख रूपयांपर्यंतचा व्याज रकमेचा परतावा महामंडळ करते.
  • कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम www.udyog.mahaswayam.gov.in या पोर्टल वर जाऊन आधार कार्ड सोबत नोंदणी करावी .
  • अर्ज करताना अर्जदाराच्या आधारलिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल, जर मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करत असणार तेव्हाही OTP येईल. 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे – वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना  

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे.

  1. ओळखीचा पुरावा – आधार कार्ड ( आधार कार्ड वरील फोटो व आधार क्रमांक असलेली समोरील बाजू अपलोड करावी.)
  2. रहिवासी पुरावा – खालीलपैकी एक 
  • अद्यावत लाईटबील 
  • अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक 
  • रेशन कार्ड ची झेरॉक्स 
  • भाडे कराराची प्रत 
  • अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची झेरॉक्स 
  • अद्यावत टेलिफोन बिल 
  • तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला 

वरीलपैकी पुरावा अर्जदाराच्या नावाने नसेल तर ज्यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्याशी असणारे नाते दर्शविणारा पुरावा जोडावा.

  1. उत्पन्नाचा पुरावा – तहसिलदारांनी दिलेला चालु वर्षाचा कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला किंवा अर्जदाराची स्वतःची ITR ची प्रत व पती/पत्नीची ITR ची प्रत जोडावी.
  2. जातीचा पुरावा – जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला.
  3. एक पानी प्रकल्प अहवाल 
  4. स्वयंघोषणापत्र 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे -व्याजाच्या मागणीसाठी माहिती अद्यावत करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • कर्ज वितरणाचा पुरावा – Disbursal Proof 
  • बँक मंजुरी पत्र – Bank Sanction Letter 
  • बँक हफ्त्यांचे वेळापत्रक – Bank EMI Schedule 
  • प्रकल्प अहवाल एक पानी – Project Report one page 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे – व्याजाच्या मागणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • हफ्ते भरल्याच्या पुराव्याचे बँक स्टेटमेंट – Bank Statement With Proof Of Payment / Interest Debit In ODC a/c 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे – गट कर्ज व्याज परतावा योजना

गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी लागणारी गटाची माहिती व कागदपत्रे 

  • गट प्रवर्तकाची वैयक्तिक माहिती 
  • गट माहिती भाग १
  • गट माहिती भाग २
  • गटातील सर्व सभासदांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला. किंवा सर्वांचे ITR अपलोड करावे.
  • प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सहीचा ठराव.
  • गटातील सर्व सभासदांचा आधार तपशील 
  • कंपनी नोंदणीची प्रत.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे – इतर कागदपत्रे व योजने संबंधित कार्ये 

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तो कर्जाच्या व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे की नाही. ते पाहिले जाईल काही त्रुटी असल्यास महामंडळाकडून कळविले जाईल.व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्र ( LOI ) ऑनलाईन दिले जाईल. त्यासोबतच कर्ज हमीचे शासनाचे पत्र ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल.

अटी व शर्ती मंजूर असल्याचे शपथपत्र अर्जदाराला ऑनलाईन फॉरमॅट मधून भरावे लागेल.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थ्यांने व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसायाचे दोन फोटो सहा महिन्याच्या आत अपलोड करायचे आहेत.

महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाल्यानंतर लाभार्थ्यांने त्याच्या व्यवसायाच्या फलकावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक सहाय्याने व्यवसाय सुरू केला असल्याचा उल्लेख करावा लागेल.

महाराष्ट्र शासनाने मराठा बांधवांसाठी राबविल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे व माहिती आपण या लेखामध्ये पाहिली,त्याचप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी पाहण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.

जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी

ट्रॅक्टर अवजारांवर कोणत्या अवजारासाठी किती अनुदान रक्कम मिळते ते पहा.

ट्रॅक्टर अवजारे अनुदान

Leave a Comment