नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे कोणकोणती लागतात ते आपण येथे पाहणार आहोत.
बांधकाम कामगारांना आपल्या हक्काचे घर बांधण्यासाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या अटल बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतात.
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे –
1. ओळखपत्र – ( महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिलेले )
2. बँक खात्याचे पासबुक
3. रहिवासी पुरावा – ( खालील पैकी कोणतेही एक कागदपत्र )
* रेशन कार्ड
* आधार कार्ड
* ड्रायव्हिंग लायसेन्स
* ग्रामपंचायत रहिवासी दाखला
* मागील महिन्याचे वीज बिल
4. अर्ज (ठराविक नमुन्यातील)
5. स्वयंघोषणापत्र – महाराष्ट्रामध्ये स्वतःचे पती किंवा पत्नीच्या नावावर सिमेंटचे पक्के बांधकाम केलेले घर नसल्याचे.
6. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र आहे असे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र.
7. प्रधानमंत्री आवास योजनेत नाव असलेली प्रमाणित यादी
8. शासकीय ठेकेदाराकडे काम केल्याचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र
अटल बांधकाम कामगार आवास योजनेची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये पहिल्या विवाहाचा खर्च, सुरक्षा विमा योजना, कामगारांच्या लहान मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना आणि शैक्षणिक खर्चासाठी अर्थसहाय्य, आरोग्य विषयक बाबींमध्ये प्रसूती शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांसारख्या योजना राबविल्या जातात.
अशाच प्रकारे बांधकाम कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी व अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण या योजना राबविल्या जातात.यासाठी बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे लागतात ती जोडून घरकुल साठी अर्ज करू शकतात. 2 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून बांधकाम कामगार आपल्या कच्च्या घराचे पक्क्या घरामध्ये रूपांतर करू शकतात.
ज्या बांधकाम कामगारांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल त्यांना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देखील दिले जाते. जेणे करून बांधकाम कामगार आपल्या स्वतःचे घर बांधू शकतात.
नोंदणीसाठी पात्रता निकष व कागदपत्रे
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे पाहण्या अगोदर बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांच्या नोंदणी साठी पात्रता निकष ठरवलेले आहेत. नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.
नोंदणीसाठी पात्रता निकष –
- बांधकाम कामगारांचे वय 18 ते 60 वर्ष या दरम्यान असावे.
- ज्या कामगारांनी मागील 12 महिन्यांमध्ये कमीतकमी 90 दिवस व त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले आहे असे कामगार.
नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे –
- ओळखपत्र पुरावा – मूळ आधार कार्ड
- रहिवासी पुरावा – रेशन कार्ड
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. त्याच बरोबर नोंदणीसाठी फॉर्म V भरून वरील सर्व दस्तऐवजासह सादर करणे अनिवार्य आहे.
90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कंत्राटदार, ठेकेदार व विकासक यांना आहेत. त्यांच्याकडे 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकामाचे काम केले असल्यास त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊ शकतो. तसेच ग्रामसेवकाकडून ही 90 दिवसांचे प्रमाणपत्र घेऊ शकतो.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ओळखपत्र दिले जाते. त्याचा वापर करून बांधकाम कामगार अटल बांधकाम कामगार घरकुल योजनेचा तसेच इतर आर्थिक लाभाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.
नविन बांधकाम कामगार नोंदणी आता तालुका कामगार सुविधा केंद्रातूनच केली जाणार आहे. तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी व नुतनीकरण तसेच आर्थिक लाभाच्या मदतीसाठी सुविधा पुरविण्यात येते.तरी आपल्या नजिकच्या कामगार सुविधा केंद्रात आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन नोंदणी करावी. नजिकच्या कामगार सुविधा केंद्राचा पत्ता व संपर्क क्रमांक बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
बांधकाम ठेकेदारचे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नमूना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ग्रामसेवकाच्या सहीचे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नमूना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
बांधकाम कामगारांना आपल्या हक्काचे घर बांधण्यासाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या अटल बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतात.
1. ओळखपत्र – ( महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिलेले )
2. बँक खात्याचे पासबुक
3. रहिवासी पुरावा – ( खालील पैकी एक कागदपत्र )
* रेशन कार्ड
* आधार कार्ड
* ड्रायव्हिंग लायसेन्स
* ग्रामपंचायत रहिवासी दाखला
* मागील महिन्याचे वीज बिल
4) अर्ज (ठराविक नमुन्यातील)
5) स्वयंघोषणापत्र – महाराष्ट्रामध्ये स्वतःचे पती किंवा पत्नीच्या नावावर सिमेंटचे पक्के बांधकाम केलेले घर नसल्याचे
6) प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र आहे असे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र
7) प्रधानमंत्री आवास योजनेत नाव असलेली प्रमाणित यादी
8) शासकीय ठेकेदाराकडे काम केल्याचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र
शासनाच्या नवीन नियमांनुसार कागदपत्रांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो ,तरी नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊन किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वरून अधिक माहिती घेऊ शकता.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांची नोंदणी करून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्याचे काम केले जाते. यामध्ये बांधकाम क्षेत्रातील वेगवेगळी कामे करणारे कामगार मजूर येतात. इमारती व रस्त्यांची कामे करणारे कामगार, दगड कापणारे, फोडणारे व दगडाचा बारीक चुरा करणारे, फरशी बसविणारे,गटार व नळजोडणीची कामे करणारे, बंधारे बांधणारे, बोगदा, पुल यांचे बांधकाम करणारे, सुतारकाम, लोहारकाम, इलेक्ट्रिक काम यांसारखी बांधकामाची कामे करणारे व बांधकामाशी संबंधित इतर कामे करणारे मजूर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करू शकतात.व मंडळाच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.