भूमी अभिलेख भूकरमापक भरती मध्ये, महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागामार्फत भूकरमापक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांना ही एक चांगली सुवर्णसंधी आहे. भूमि अभिलेख भूकरमापक भरती 2025 अंतर्गत भूमी अभिलेख विभागातील घटक संवर्गातील एकूण अंदाजे 903 रिक्त पदे भरली जाणार असून ही पदे महाराष्ट्र राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये विभागलेली आहेत. विभाग नुसार पदसंख्या तसेच या पदासाठी वेतनश्रेणी, भरतीच्या महत्त्वाच्या तारखा, परीक्षेचे स्वरूप, आवश्यक पात्रता व शैक्षणिक अर्हता व सूचना आपण पुढे पाहणार आहोत.
भूमी अभिलेख भूकरमापक भरती साठी महाराष्ट्रातील विभागांनुसार पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये भूकरमापक संवर्गातील पदे विभागलेली आहेत.
| विभाग | पदसंख्या | 
| पुणे | 83 | 
| कोकण | 259 | 
| नाशिक | 124 | 
| अमरावती | 210 | 
| छ. सांभाजीनगर | 117 | 
| नागपूर | 110 | 
| एकूण | 903 | 
वरील सर्व विभागातील पदे भरताना काही जागा आरक्षित असून विशिष्ट प्रवर्गासाठी ही पदे राखीव असणार आहेत. तसेच माजी सैनिक यांना 15%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, महिला 30%, खेळाडू 5%, अंशकालीन 10% आणि समांतर आरक्षण विरहित यांना त्यांच्या टक्केवारीनुसार पदे राखीव ठेवण्यात येतील.
सर्व विभागांमध्ये एकाच परीक्षेद्वारे विभागनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्यामुळे एका उमेदवारांनी कोणत्याही एकाच विभागासाठी अर्ज करावा. तसेच अधिकृत जाहिराती मधील विभागनिहाय उपलब्ध पदे पाहूनच हव्या त्या विभागाची निवड करून ऑनलाईन अर्ज करावा.

भूमी अभिलेख भूकरमापक भरती साठी वेतनश्रेणी
भूकरमापक या पदासाठी वेतन स्थर (रुपये 19900 – 63200)
भूमी अभिलेख भूकरमापक भरती ची भरती प्रक्रिया –
| ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी | दिनांक 1/10/2025 ते 24/10/2025 | 
| ऑनलाइन शुल्क भरण्याचा कालावधी | दिनांक 1/10/2025 ते 24/10/2025 | 
| परीक्षेची प्रस्तावित तारीख | दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2025 | 
वरील परीक्षेच्या तारखांमध्ये नियोजनानुसार आवश्यक बदल होऊ शकतो.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
भूमीअभिलेख च्या वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट द्वारा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
भूमी अभिलेख भूकरमापक भरती साठी परीक्षा शुल्क
| अमागास प्रवर्ग | रुपये 1000 | 
| मागास प्रवर्ग | रुपये 900 | 
| माजी सैनिक | शुल्क माफ | 
भूमी अभिलेख भूकरमापक भरती साठी आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
भूमि अभिलेख भूकरमापक भरती साठी उमेदवाराने खालील दोन पर्यायांपैकी कोणतीही एक अट पूर्ण केलेली असावी.
1. स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma In Civil Engineering) मान्यता प्राप्त संस्थेकडील पदविका.
किंवा
2. माध्यमिक शालांत परीक्षा (SSC उत्तीर्ण) आणि सोबतच, मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र ( ITI Surveyor Certificate)
इतर आवश्यक अर्हता ( नियुक्तीनंतर पूर्ण करायच्या )
- टंकलेखन (Typing) – नियुक्तीच्या दिनांक पासून दोन वर्षांच्या आत मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
 - संगणक प्रमाणपत्र ( Computer Certificate) MS – CIT किंवा तत्सम संगणक हाताळणी / वापराचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांक पासून दोन वर्षांच्या आत मिळवणे आवश्यक आहे.
 
वयोमर्यादा – (Age Limit – 24/10/2025 पर्यंत)
किमान वय – 18 वर्षे पूर्ण
कमाल वय ( खुला प्रवर्ग ) – 38 वर्षे
मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) – कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट म्हणजेच 43 वर्षे
याशिवाय माजी सैनिक, दिव्यांग, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादित सूट मिळेल.

आमचे व्यवसाय संबंधित लेख देखील वाचा येथे क्लिक करा.
भूमी अभिलेख भूकरमापक भरती साठी परीक्षा स्वरूप
ऑनलाइन स्पर्धा परीक्षा स्वरूपामध्ये हि परीक्षा होणार आहे.
भूकर मापक पदासाठी 200 गुणांची ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल.
| अ. क्र. | विषय | प्रश्न | गुण | माध्यम | कालावधी | 
| 1 | इंग्रजी | 25 | 50 | इंग्रजी | 30 मि. | 
| 2 | मराठी | 25 | 50 | मराठी | 30 मि. | 
| 3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | इंग्रजी व मराठी | 30 मि. | 
| 4 | बौद्धिक चाचणी /अंकगणित | 25 | 50 | इंग्रजी व मराठी | 30 मि | 
| 100 | 200 | 120 मि | 
- परीक्षेसाठी एकूण 120 मिनिटांचा (2 तास) कालावधी असेल.
 - नकारात्मक गुणांकन ( Negative Marking ) नाही.
 - निवड होण्यासाठी ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण (म्हणजे 200 पैकी 90 गुण) मिळवणे आवश्यक आहे.
 
[आमच्या वेबसाइटवरील माहिती वाचून तुमच्या चुकीमुळे किंवा आमच्या माहितीतील त्रुटीमुळे किंवा जाहिरातदाराच्या बदलांमुळे तुमचे कोणतेही नुकसान (आर्थिक किंवा इतर) झाल्यास, त्यासाठी smartnirnay.com कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.अर्ज करण्याची अंतिम मुदत, पात्रता आणि शुल्क यांसारखे महत्त्वाचे तपशील तसेच सविस्तर माहिती तुम्ही संबंधित कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website) नेहमी स्वतः तपासावेत.]
भूमी अभिलेख भूकरमापक भरती साठी अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना
मित्रांनो अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
एका विभागासाठी एकच अर्ज –
- उमेदवारास महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच विभागा करिता ( उदा. फक्त पुणे विभाग किंवा कोकण विभाग) अर्ज सादर करता येईल.
 - एकापेक्षा जास्त विभागांसाठी अर्ज केल्यास सर्वात शेवटी भरलेला अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि पूर्वीचे सर्व अर्ज रद्दबातल ठरतील.
 
माहिती अचूक भरा –
- ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती अंतिम मानली जाईल आणि अर्ज सादर केल्यानंतर ती बदलता येणार नाही.
 - त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी नाव, प्रवर्ग, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा यांसारखी माहिती तंतोतंत बरोबर असल्याची खात्री करा.
 
निवड आणि प्राधान्यक्रम –
- समान गुणांचा निकष – दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्ल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर जास्त वयाच्या उमेदवारास आणि नंतर उच्च शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारास प्राधान्य मिळेल.
 
भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक हे करिअरच्या दृष्टीने एक उत्कृष्ट संधी आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून 24 ऑक्टोबर 2025 ही अंतिम मुदत आहे.
तुम्हाला परीक्षेसाठी आणि तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
			








