दिनविशेष यादी 

जगातील काही देशांमध्ये प्रत्येक वर्षातील 365 दिवसांतील काही विशिष्ठ दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पाळले जातात. ठराविक तारखेला ठरवलेला दिवस साजरा केला जातो.194 सदस्य देश असणाऱ्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून वर्षातील काही दिवस विशेष दिवस म्हणून ठरवले आहेत.आणि सदस्य देशांकडून ते साजरे केले जातात. काही दिवसांना जागतिक मान्यता आहे.सर्वच देश विशेष दिवस साजरे करतात असे नाही, काही देश त्यांचे पूर्वापार चालत आलेले दिवस साजरे करतात. प्रत्येक देशातील इतिहास, विशिष्ट भागातील भाषा, संस्कृती, राहणीमान यावरून विशेष दिवस ठरवले जातात.

जागतिक दिवसांना वैश्विक दिन, आंतरराष्ट्रीय दिन, म्हणूनही ओळखले जाते. आपण या लेखामध्ये युनेस्को ने ठरवलेल्या विशेष दिवसांसोबतच इतर जागतिक पातळीवर पाळले जाणारे विशेष दिवसांची दिनविशेष यादी पाहणार आहोत. तसेच आपण जगभरातून साजरे केले जाणारे दिवसांची दिनविशेष यादी सोबतच भारतात व महाराष्ट्रात साजरे केले जाणारे विशेष दिवसांची दिनविशेष यादी देखील पाहणार आहोत.

जानेवारी महिन्यातील दिनविशेष यादी 

1 जानेवारी 

जागतिक दिनविशेष – ग्रेगोरियन कॅलेंडरचा पहिला दिवस.

भारतीय दिनविशेष – आर्मी मेडिकल कोअर स्थापना दिवस

3 जानेवारी 

भारतीय दिनविशेष – बालिका दिवस 

महाराष्ट्रातील दिनविशेष – सावित्रीबाई फुले जयंती 

6 जानेवारी 

भारतीय दिनविशेष – पत्रकार दिवस 

महाराष्ट्रातील दिनविशेष – बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन 

9 जानेवारी 

भारतीय दिनविशेष – अनिवासी भारतीय दिवस 

10 जानेवारी 

जागतिक दिनविशेष यादी हास्य दिवस

12 जानेवारी 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय युवक दिन 

राजमाता जिजाबाई भोसले जयंती 

14 जानेवारी 

जागतिक दिनविशेष – तर्कशास्त्र दिवस 

भारतीय दिनविशेष – भूगोल दिवस 

15 जानेवारी 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय सैन्य दिवस 

23 जानेवारी 

भारतीय दिनविशेष – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती 

24 जानेवारी 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय बालिका दिवस 

25 जानेवारी 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय कस्टम दिवस

भारतीय दिनविशेष – शारीरिक शिक्षण दिवस 

26 जानेवारी 

भारतीय दिनविशेष – प्रजासत्ताक दिन

27 जानेवारी 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय नरसंहार स्मरण दिवस 

28 जानेवारी 

भारतीय दिनविशेष – पर्यटन दिवस 

30 जानेवारी 

जागतिक दिनविशेष – कुष्ठरोग निर्मूलन दिवस

भारतीय दिनविशेष – हुतात्मा दिवस , महात्मा गांधी पुण्यतिथी

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष यादी 

1 फेब्रुवारी 

भारतीय दिनविशेष – तटरक्षक दिवस 

4 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष – कर्करोग दिवस

5 फेब्रुवारी 

भारतीय दिनविशेष – मौखिक आरोग्य दिवस 

10 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष –  कडधान्य दिवस 

11 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष – विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 

13 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष –  रेडिओ दिवस

14 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष – व्हेलेंटाईन डे 

15 फेब्रुवारी 

भारतीय दिनविशेष – भारतीय सैन्य दिवस 

19 फेब्रुवारी 

भारतीय दिनविशेष – छत्रपती शिवाजी महाराज जयंती 

20 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष – सामाजिक न्यायदिन 

21 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष –  मातृभाषा दिवस 

22 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय स्काऊट गाईड दिवस 

24 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष – क्षयरोग निवारण दिवस 

– जागतिक मुद्रण दिन 

भारतीय दिनविशेष – केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस 

26 फेब्रुवारी 

महाराष्ट्रातील दिनविशेष – सिंचन दिवस, शंकरराव चव्हाण स्मृतिप्रीत्यर्थ 

27 फेब्रुवारी 

जागतिक दिनविशेष – नाट्यदिन 

महाराष्ट्रातील दिनविशेष – मराठी भाषा गौरव दिवस 

– कुसुमाग्रज जयंती 

28 फेब्रुवारी 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय विज्ञान दिवस 

मार्च महिन्यातील दिनविशेष यादी 

4 मार्च 

जागतिक दिनविशेष – अभियांत्रिकी दिन शाश्वत विकासासाठी 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय संरक्षण दिवस 

8 मार्च 

जागतिक दिनविशेष – महिला दिवस 

10 मार्च 

महाराष्ट्रातील दिनविशेष – उद्योग दिवस, लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर स्मृतीप्रीत्यर्थ 

12 मार्च 

भारतीय दिनविशेष – समता दिवस, यशवंतराव चव्हाण जन्मदिवस 

14 मार्च 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय गणित दिवस 

15 मार्च 

जागतिक दिनविशेष – ग्राहक दिन

17 मार्च 

जागतिक दिनविशेष – अपंग दिन 

20 मार्च 

जागतिक दिनविशेष – फ्रेंच भाषा दिवस 

                           – चिमणी दिवस 

                           – आनंद दिवस 

21 मार्च 

जागतिक दिनविशेष – कविता दिवस 

– जातीय भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 

– नवरोज दिवस 

– वन दिन 

22 मार्च 

जागतिक दिनविशेष – जल दिवस 

23 मार्च 

जागतिक दिनविशेष – हवामान दिन 

भारतीय दिनविशेष – शहीद स्मृतिदिन 

24 मार्च 

जागतिक दिनविशेष – क्षय दिन

30 मार्च 

जागतिक दिनविशेष – डॉक्टर दिवस 

युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वेबसाइटला भेट दया,क्लिक करा.

एप्रिल महिन्यातील दिनविशेष यादी 

1 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – मूर्ख दिवस ( एप्रिल फूल)

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय हवाई दल दिवस 

5 एप्रिल

जागतिक दिनविशेष –  विवेक दिवस 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय सागर दिवस 

6 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय क्रीडा विकास आणि शांतता दिवस 

7 एप्रिल

जागतिक दिनविशेष – आरोग्य दिन

8 एप्रिल

जागतिक दिनविशेष – बंजारा दिवस 

11 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – पार्किन्सन दिवस 

महाराष्ट्रातील दिनविशेष – शिक्षक हक्क दिवस 

– महात्मा फुले जयंती 

13 एप्रिल 

भारतीय दिनविशेष – जालियनवाला बाग हत्याकांड दिवस 

14 एप्रिल 

भारतीय दिनविशेष – अग्निशमन दिवस 

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 

महाराष्ट्रातील दिनविशेष – ज्ञान दिन 

15 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – कला दिन

22 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – वसुंधरा दिवस 

23 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – पुस्तक आणि कॉपीराइट दिवस

24 एप्रिल 

भारतीय दिनविशेष – जलसंपत्ती दिवस 

25 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – मलेरिया दिवस 

29 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 

30 एप्रिल 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस

भारतीय दिनविशेष – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती 

मे महिन्यातील दिनविशेष यादी 

1 मे 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय कामगार दिवस 

– गुलमोहर दिवस 

– दमा दिवस 

भारतीय दिनविशेष – रणगाडा दिवस

महाराष्ट्रातील दिनविशेष – महाराष्ट्र दिन 

– मराठी राजभाषा दिन 

– महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस 

4 मे 

जागतिक दिनविशेष – अग्निशमन दिवस 

8 मे 

जागतिक दिनविशेष – रेडक्रॉस दिवस 

9 मे 

जागतिक दिनविशेष – थॅलेसेमिया दिवस 

10 मे 

जागतिक दिनविशेष – मातृदिन 

महाराष्ट्रातील दिनविशेष – जलसंधारण दिन, सुधाकरराव नाईक स्मृतिप्रीत्यर्थ 

11 मे 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 

12 मे 

जागतिक दिनविशेष – परिचारिका दिवस 

13 मे 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय एकात्मता दिवस 

15 मे 

जागतिक दिनविशेष – कुटुंबपरिवार दिवस 

16 मे 

जागतिक दिनविशेष – कृषी पर्यटन दिवस 

17 मे 

जागतिक दिनविशेष – दूरसंचार दिवस 

19 मे 

जागतिक दिनविशेष – कावीळ दिवस 

21 मे 

जागतिक दिनविशेष – दहशतवाद विरोधी दिवस 

23 मे 

जागतिक दिनविशेष – कासव दिन 

24 मे 

जागतिक दिनविशेष – बंधु दिवस 

31 मे 

जागतिक दिनविशेष – तंबाखू विरोधी दिवस 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

दिनविशेष यादी सोबतच आमचे इतर लेख हि पहा

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेच्या माहितीसाठी क्लिक करा.

जून महिन्यातील दिनविशेष यादी 

1 जून 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय बालदिवस 

– पालकदिन

– दूध दिवस 

4 जून

जागतिक दिनविशेष – बाल रक्षक दिवस 

5 जून 

जागतिक दिनविशेष – पर्यावरण दिवस 

7 जून 

जागतिक दिनविशेष – अन्न सुरक्षा दिवस 

8 जून 

जागतिक दिनविशेष – महासागर दिवस 

10 जून 

जागतिक दिनविशेष – दृष्टिदान दिवस 

11 जून 

जागतिक दिनविशेष – बालकामगार मुक्ती दिवस 

भारतीय दिनविशेष – राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी 

12 जून 

जागतिक दिनविशेष – बालकामगार विरोधी दिवस 

भारतीय दिनविशेष – पु.ल.देशपांडे यांचा स्मृतिदिन 

14 जून 

जागतिक दिनविशेष – रक्तदान दिवस 

15 जून 

जागतिक दिनविशेष – ज्येष्ठ नागरिक छळ विरोध जागृती दिवस 

– हवा दिवस 

16 जून 

भारतीय दिनविशेष – गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार जन्मदिवस 

17 जून 

जागतिक दिनविशेष – वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस 

भारतीय दिनविशेष – राजमाता जिजाबाई यांचे निधन 

19 जून 

जागतिक दिनविशेष – सांत्वन दिवस 

भारतीय दिनविशेष – प्रवासवर्णकार,कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन 

20 जून 

जागतिक दिनविशेष – निर्वासित दिवस 

21 जून 

जागतिक दिनविशेष – संगीत दिवस 

आंतरराष्ट्रीय योग दिवस 

25 जून 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय नाविक दिवस 

– त्वचारोग दिवस 

26 जून

जागतिक दिनविशेष – अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस 

 महाराष्ट्रातील दिनविशेष – सामाजिक न्याय दिवस, शाहू महाराज जयंती 

जुलै महिन्यातील दिनविशेष यादी 

1 जुलै 

भारतीय दिनविशेष – डॉक्टर दिवस 

महाराष्ट्रातील दिनविशेष – कृषी दिन, वसंतराव नाईक जयंती 

7 जुलै 

जागतिक दिनविशेष – किस्वाहिली भाषा दिवस 

10 जुलै 

जागतिक दिनविशेष – जलसंपत्ती दिवस 

11 जुलै 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस 

15 जुलै 

जागतिक दिनविशेष – युवा कौशल्य दिवस 

18 जुलै 

जागतिक दिनविशेष – नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस 

20 जुलै 

जागतिक दिनविशेष – बुद्धिबळ दिवस 

22 जुलै 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय ध्वज दिवस 

23 जुलै 

जागतिक दिनविशेष – प्रसारण दिवस 

भारतीय दिनविशेष – वनसंवर्धन दिवस 

26 जुलै 

भारतीय दिनविशेष – कारगिल विजय दिवस 

28 जुलै 

जागतिक दिनविशेष – हिपॅटायटीस दिवस 

29 जुलै 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिवस 

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष यादी 

4 ऑगस्ट 

जागतिक दिनविशेष – हृदय प्रत्यारोपण दिवस 

9 ऑगस्ट 

जागतिक दिनविशेष – जागतिक आदिवासी दिवस 

12 ऑगस्ट 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय युवा दिवस 

13 ऑगस्ट 

जागतिक दिनविशेष – अवयवदान दिवस 

15 ऑगस्ट 

भारतीय दिनविशेष – भारतीय स्वतंत्रता दिवस 

19 ऑगस्ट 

जागतिक दिनविशेष – जागतिक छायाचित्रण दिवस 

20 ऑगस्ट 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय सद्भावना दिवस, राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ 

– अक्षय ऊर्जा दिवस 

21 ऑगस्ट 

जागतिक दिनविशेष – ज्येष्ठ नागरिक दिवस 

23 ऑगस्ट 

जागतिक दिनविशेष – गुलामगिरी निर्मूलन दिवस

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय अंतराळ दिवस 

29 ऑगस्ट 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय क्रीडा दिवस 

महाराष्ट्रातील दिनविशेष – शेतकरी दिन, विठ्ठलराव विखे पाटील स्मरणार्थ 

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष यादी 

1 सप्टेंबर 

महाराष्ट्रातील दिनविशेष – रेशीम दिन 

2 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय नारळ दिवस 

4 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय कन्या दिवस 

5 सप्टेंबर 

भारतीय दिनविशेष – शिक्षक दिन 

– राष्ट्रीय संस्कृत दिवस 

8 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – साक्षरता दिवस 

9 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – शिक्षणाला हल्ल्यांपासुन वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 

10 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – आत्महत्या प्रतिबंधक दिवस 

11 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – प्रथमोपचार दिवस 

14 सप्टेंबर 

भारतीय दिनविशेष – हिंदी दिवस 

15 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस 

16 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – ओझोन दिवस 

20 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय खेळ दिवस 

21 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय शांतता दिवस 

– अल्झायमर दिवस 

22 सप्टेंबर 

महाराष्ट्रातील दिनविशेष – श्रमप्रतिष्ठा दिन, कर्मवीर भाऊराव पाटील स्मरणार्थ 

25 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – पाली दिवस 

26 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – कर्णबधिर दिवस 

27 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – पर्यटन दिवस 

28 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – रेबीज दिवस 

– आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस 

महाराष्ट्रातील दिनविशेष – राज्य माहिती अधिकार दिन 

29 सप्टेंबर 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

– जागतिक हृदय दिन

30 सप्टेंबर

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस

 

ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष यादी 

1 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – जागतिक शाकाहार दिवस 

2 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस

भारतीय दिनविशेष – महात्मा गांधी जयंती 

4 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – प्राणी दिवस 

5 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – शिक्षक दिन

स्मितहास्य दिवस 

6 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – भूविविधता दिवस 

8 ऑक्टोबर 

भारतीय दिनविशेष – भारतीय वायु दिन 

9 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – टपाल कार्यालय दिवस 

10 ऑक्टोबर

जागतिक दिनविशेष – मानसिक आरोग्य दिवस 

11 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – बालिका दिवस 

13 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी पाळलेला दिवस 

15 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – अंध दिन 

– हस्तप्रक्षालन दिवस ( हात स्वच्छ धुण्यासाठी प्रेरित करण्यासाठी )

16 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – अन्न दिवस 

17 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस 

21 ऑक्टोबर 

भारतीय दिनविशेष – पोलिस हुतात्मा दिवस 

23 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – मानक दिन

24 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – संयुक्त राष्ट्र संघ दिवस 

27 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – दृकश्राव्य वारसा दिवस 

30 ऑक्टोबर 

जागतिक दिनविशेष – बचत दिवस 

31 ऑक्टोबर 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय एकता दिवस 

नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष यादी 

2 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्ती समाप्त करण्याचा दिवस 

– औद्योगिक सुरक्षा दिवस 

3 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – जिवावरण राखीव क्षेत्र दिवस 

4 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – युनेस्को दिवस 

5 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – रोमानी भाषा दिवस 

– त्सुनामी जागरूकता दिवस 

महाराष्ट्रातील दिनविशेष – रंगभूमी दिन, विष्णुदास भावे जयंती 

7 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – कर्करोग जागृती दिन

महाराष्ट्रातील दिनविशेष – विद्यार्थी दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरणार्थ 

10 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – शांतता आणि विकासासाठी विज्ञान दिवस 

– परिवहन दिन

– मलाला दिवस 

11 नोव्हेंबर 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय शिक्षण दिवस 

12 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – न्युमोनिया दिवस 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय पक्षी दिन 

14 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – सांस्कृतिक मालमत्तेच्या गैरवैध व्यापाराच्या विरोधात आंतरराष्ट्रीय दिवस 

– मधुमेह दिवस 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय बाल दिवस

महाराष्ट्रातील दिनविशेष – जैवतंत्रज्ञान दिन

15 नोव्हेंबर 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय हत्तीरोग दिवस 

16 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – सहनशीलता दिवस 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय प्रेस दिवस 

18 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – बाल लैंगिक शोषण,अत्याचार आणि हिंसाचारापासून बचाव आणि उपचारांसाठी 

19 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – पुरुष दिवस 

– आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन

– नागरिक दिन

20 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – अल्पसंख्यांक कल्याण दिवस

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय झेंडा दिवस 

25 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – महिलांवरील हिंसाचार निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस 

– पर्यावरण संवर्धन दिवस 

26 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – ऑलिव्ह वृक्ष दिवस 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय छात्रसेना दिवस 

– संविधान दिवस 

महाराष्ट्रातील दिनविशेष – हुंडाबंदी दिन 

29 नोव्हेंबर 

जागतिक दिनविशेष – पॅलेस्टीन लोकांशी एकात्मतेचा दिवस 

डिसेंबर महिन्यातील दिनविशेष यादी 

1 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष यादी – एड्स दिवस 

2 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष – गुलामगिरी मुक्तता दिवस 

– संगणक साक्षरता दिवस 

3 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष – अपंग दिन 

4 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – नौदल दिवस 

5 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष – स्वयंसेवक दिवस 

– मृदा दिन 

6 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन 

7 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष – विमानवाहतूक दिवस 

8 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – सार्क दिवस 

9 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष – भ्रष्टाचार विरोधी दिवस 

10 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष – मानवी हक्क दिवस 

11 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष – पर्वत दिवस 

– युनिसेफ दिवस 

12 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – स्वदेशी दिन 

14 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – उर्जा संरक्षण दिवस 

17 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – पेन्शनर्स डे 

18 डिसेंबर 

जागतिक दिनविशेष – स्थलांतरित दिवस 

– अल्पसंख्यांक हक्क दिवस 

– अरबी भाषा दिवस 

22 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – गणित दिवस 

23 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – किसान दिवस 

24 डिसेंबर 

भारतीय दिनविशेष – राष्ट्रीय ग्राहक दिन

या लेखातील माहिती वेगवेगळ्या ठिकाणावरून घेण्यात आली असून वेगवेगळ्या देशातील मान्यतेनुसार विशेष दिवस ठरवले आहेत. त्यामुळे दिनविशेष यादी मधील काही तारखां मध्ये तफावत असू शकते.

ड्रोन फवारणी यंत्र किंमत

अधिक माहितीसाठी क्लिक करा .

Leave a Comment