ड्रोन फवारणी यंत्र किंमत 

ड्रोन फवारणी यंत्र किंमत, प्रकार व माहिती आपण येथे पाहणार आहोत. भारतात केल्या जाणाऱ्या शेतीमध्य दिवसेंदिवस झपाट्याने प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने फायदा मिळत आहे. शाश्वत शेतीसाठी ठिबक सिंचन, लागवडीपासून ते कापणी आणि प्रतवारी पर्यंत कृषी यंत्रांचा वापर यशस्वीपणे केला जात आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असताना शेतीमध्ये ड्रोनची गरज भासू लागली आहे. पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळताना शेतीमध्ये होणारा खर्च, मजुरी, लागणारा वेळ, रासायनिक खते व औषधे यांचा वापर यामध्ये अचूकता मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे अती आवश्यक झाले आहे.

शेतामध्ये रासायनिक खते व औषधे फवारताना मनुष्यबळ लागते तेव्हा श्रम व वेळ अधिक लागतो.ड्रोनचा फवारणीसाठी वापर केल्याने कमी वेळामध्ये जास्त क्षेत्रामध्ये फवारणी करणे शक्य होते व रसायनांचा अचूकपणे वापर करता येतो. फवारणी करणाऱ्या माणसाला घातक कीटनाशकांच्या संपर्कात न आणता आपण फवारणी करू शकतो. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने रसायनांचा होणारा अधिकचा वापर आपण कमी करू शकतो. जेणे करून रसायनांचा अचूक व कार्यक्षमपणे वापर होईल, त्यासाठी ड्रोनचा फवारणीसाठी वापर करणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

पारंपारिक पद्धतीने किटकनाशक फवारणी करताना पाठीवर पंप घेउन हाताने किंवा ट्रॅक्टर स्प्रेयरने फवारणी केली जाते. यामध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो आणि फवारणीचा मोठा भाग वातावरणात वाया जातो. ड्रोन आधारित फवारणी केल्याने कमी प्रमाणात पाणी आणि कीटकनाशके लागतात त्यामुळे अधिक कार्यक्षम व प्रभावीपणे फवारणी करण्यासाठी ड्रोन फवारणी यंत्राच्या वापराची गरज निर्माण होते.

ड्रोन फवारणी यंत्राबाबत सरकारचे धोरण आणि योजना 

शेतातील पिकांमध्ये किटकनाशक आणि रासायनिक औषधे फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वैयक्तिक किंवा सामूहिक वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून सुविधा पुरवली जाईल जेणेकरून भविष्यातील तंत्रज्ञान म्हणून देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आणि सहजपणे ड्रोनची उपलब्धता होईल. किटकनाशक फवारताना ड्रोनने कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही व जर नुकसान झाल्यास ते हाताळण्यासाठी कृषी विमा प्रणालीसोबत जोडले जाईल. याची दक्षता सरकार मार्फत घेण्यात येईल. कीटक नाशकांचा वापर करताना ड्रोन चालवण्यासाठी नियमांचे पालन करणे, ड्रोन उडवण्यासाठीच्या परवानग्या, प्रतिबंधित क्षेत्र, गर्दीच्या ठिकाणचे निर्बंध, ड्रोन नोंदणी, सुरक्षा विमा तसेच ड्रोन चालक प्रमाणपत्र यांसारख्या बाबींचे नियमन सरकार मार्फत केले जाते.

    नमो ड्रोन दीदी योजना 

ड्रोन फवारणी यंत्र वापरासाठी प्रोत्साहन देणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी व शेतकऱ्यांना कमी दराने भाडेतत्वावर ड्रोन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार मार्फत नमो ड्रोन दीदी योजना राबविली जाते, ज्यामध्ये महिला व त्यांच्या स्वयंसहायता बचत गटाला ड्रोन फवारणी यंत्राचा वापर करून व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.ड्रोन फवारणी यंत्र किंमत च्या 80% रक्कम किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये एव्हढी रक्कम ड्रोन खरेदी व इतर उपकरणे घेण्यासाठी दिली जाते. जेणे करुन बचत गटातील महिला आपला व्यवसाय सुरू करू शकतील.

अनुदानाव्यतिरिक्त 20% रक्कमेची तरतूद करण्यासाठी महिलांना कमी व्याज दराने कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते. नमो ड्रोन दीदी योजने अंतर्गत बचत गटातील ड्रोन चालक महिलेला 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते व विमा सुरक्षा दिली जाते जेणे करून काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई होईल. शेतकऱ्यांना भाडे तत्वावर सेवा पुरविणाऱ्याकडून एकरी 300 ते 600 रुपये मजुरी घेतली जाते.

   महा डीबीटी ड्रोन अनुदान योजना 

केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना सन 2024 – 25 अंतर्गत. ड्रोन खरेदीला अर्थसहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते.

ड्रोन फवारणी यंत्र खरेदीसाठी कृषी पदवीधर, ग्रामीण भागातील नवउद्योजक, स्वयंसहायता बचत गट (SHG), शेतकरी उत्पादक कंपनी (FPO), शेतकऱ्यांची सहकारी संस्था, चालू स्थितीतील औजार बँक तसेच कृषी विज्ञान केंद्र (KVK) यांना अनुदानाचे अर्थसहाय्य दिले जाते. शेतकऱ्यांना ड्रोन आधारित इतर सेवा सुविधा पुरवण्यासाठी सेवा सुविधा केंद्राच्या स्थापनेसाठी देखील अर्थसहाय्य दिले जाते.

महा डीबीटी ड्रोन अनुदान योजना पात्रता व अर्ज प्रक्रिया 

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान सन 2024 – 25 अंतर्गत 

  • कृषी विषयातील पदवीधरांना ड्रोन फवारणी यंत्र किंमत च्या 50% किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
  • ग्रामीण भागातील उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी (FPO), शेतकरी बचत गट (SHG), शेतकऱ्यांची सहकारी संस्था,औजार बँक यांना ड्रोन फवारणी यंत्र किंमत च्या 40% रक्कम किंवा जास्तीत जास्त 4 लाख रुपये अनुदान दिले जाते.
  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राला (KVK) अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत 100% अर्थसहाय्य मिळते.

ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीवर अनुदान मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या महा डीबीटी या पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा लागतो. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ज्यांच्या नावाने अर्ज करायचा त्यांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक, डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्याचा तपशील भरून अर्ज करावा, अर्जाची ऑनलाईन फी भरल्यानंतर अर्ज सबमिट होतो. त्यानंतर कृषी विभागामार्फत ऑनलाइन सोडत काढली जाते. त्यामध्ये आपली निवड झाल्यावर कृषी विभाग ड्रोन फवारणी यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती देते.

ड्रोन यंत्र खरेदी करताना ते शासनाने मान्यता देऊन नियुक्त करण्यात आलेल्या कंपनी कडूनच खरेदी करणे अनिवार्य राहील, त्या कंपनीकडून यंत्राचे कोटेशन घेउन ते अपलोड केल्यानंतरच आपण ड्रोन फवारणी यंत्र खरेदी करू शकतो. खरेदीपावती बिल व इतर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वर्ग केली जाते.

कृषी विभागाच्या महा डीबीटी पोर्टलवर जाण्यासाठी क्लिक करा.

भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ड्रोन प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना अधिकृत ड्रोन प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता दिली असून.विद्यापीठात प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाते.

ड्रोन फवारणी यंत्र किंमत

ड्रोन अनुदान योजनेतून अनुदान मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून मान्यता मिळवलेल्या कंपनी कडूनच ड्रोन फवारणी यंत्र खरेदी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 4 कंपन्यांना नियुक्त करण्यात आले आहे त्या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत.

  • Garuda Aerospace 
  • Iotech world 
  • Marut Drones 
  • Dhaksha Drones 

या कंपन्या शेतीमध्ये रसायने फवारण्यासाठी ड्रोन फवारणी यंत्राची निर्मिती करतात आणि ग्राहकांना आपल्या सेवा पुरवतात. ड्रोन फवारणी यंत्राचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. आपल्या गरजेनुसार ड्रोन यंत्राची निवड करू शकतो. कंपनीमार्फत यंत्राची देखभाल दुरुस्तीसाठी 1 वर्षाची गॅरंटी दिली जाते. तसेच ड्रोन चालकाला कमीत कमी 15 दिवसांचे ड्रोन चालक प्रशिक्षण देखील दिले जाते. ड्रोन फवारणी यंत्र खरेदी अगोदर प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

साधारणपणे सर्व प्रकारच्या ड्रोन फवारणी यंत्र किंमत ही 6 लाख रुपये पासून ते 15 लाख रुपये पर्यंत आहे. तसेच उच्च तंत्रज्ञान असलेले ड्रोन फवारणी यंत्र किंमत 15 लाख रुपये पासून सुरू होते.

  • Garuda Aerospace Drone

Garuda Aerospace या कंपनीचे ड्रोन फवारणी यंत्र किंमत ही 6.78 लाख इतकी आहे. यामध्ये रसायने साठवण्यासाठी 10 लिटरची टाकी बसविण्यात आली असून साधारणपणे 7 मिनिटांत 1 एकर क्षेत्रावर फवारणी होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर हा ड्रोन 15 ते 20 मिनिटे फवारणी करू शकतो. त्यामुळे यंत्रासोबत अधिकचे 2 बॅटरी सेट ठेवावे लागतात. एका बॅटरी सेटची किंमत ही 60 हजार रुपये आहे.ड्रोन फवारणी यंत्र किंमत, अधिकचे बॅटरी सेट, कंपनीमार्फत दिले जाणारे प्रशिक्षण व इतर खर्च असे सर्व मिळून एकूण खर्च 10 लाख रुपये पर्यंत जातो.

  • Iotech World Drone

  Iotech World कंपनीचे ड्रोन फवारणी यंत्र किंमत ही 8 लाख रुपये पासून ते 12 लाख रुपये पर्यंत आहे.

  • Marut Drones 

Marut Drones या कंपनीचे ड्रोन फवारणी यंत्र किंमत ही 9.89 लाख रुपये ते 10.25 लाख इतकी आहे. 

  • Dhaksha Drones 

तसेच Dhaksha Drones या कंपनीचे ड्रोन फवारणी यंत्र किंमत ही जवळपास 6.80 लाख रुपये ते 12.50 लाख रुपये इतकी आहे.

वेगवेगळ्या कंपनीचे ड्रोन फवारणी यंत्र किंमत मध्ये कंपनीमार्फत पुरविल्या जाणाऱ्या इतर सेवांचा खर्च देखील समाविष्ट असू शकतो. त्यामध्ये अधिकचे दिले जाणारे बॅटरी संच, इतर उपकरण साहित्य व प्रशिक्षण या वरील खर्च अंतर्भूत असून सर्व मिळून एकूण खर्च हा 10 लाख रुपये ते 12 लाख रुपये पर्यंत होतो. तरी वरील कंपनीचे अधिकृत डीलर कडून माहिती घेऊनच ड्रोन फवारणी यंत्राची खरेदी करावी.

भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ड्रोन प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना अधिकृत ड्रोन प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता दिली असून.विद्यापीठात प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाते.

  ड्रोन फवारणी यंत्र खरेदी साठी शासनामार्फत दिले जाणारे अनुदान व भविष्यातील शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीसाठी नक्कीच उपयोगी पडेल.

बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी शासनामार्फत ”अटल बांधकाम कामगार आवास योजना ” राबविण्यात येते. अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा .

1 thought on “ड्रोन फवारणी यंत्र किंमत ”

Leave a Comment