आजकाल शेती करणे खूप कठीण झाले आहे. कधी पाऊस शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याच समस्यांवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने एक खास योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (PoCRA). ही योजना फक्त पैसे देण्यापुरती मर्यादित नाही, तर ती शेतकऱ्यांची शेती अधिक चांगली आणि सोपी बनवते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी जाहीर झाल्यापासून अनेक शेतकऱ्यांनी तिचा लाभ घेतला आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना हवामानातील बदलांशी जुळवून घ्यायला मदत करणे हे आहे.
योजनेचा उद्देश
- उत्पन्न वाढवणे – शेतकऱ्यांच्या शेतीतले उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
- पाण्याची बचत – सूक्ष्म सिंचन प्रणाली वापरुन शेतीसाठी पाण्याचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवणे आणि पाणी जपून ठेवण्यासाठी मदत करणे.
- नवीन तंत्रज्ञान वापरणे – शेतकऱ्यांना चांगले प्रमाणित बियाणे आणि आधुनिक शेतीची साधने वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- व्यवसाय सुरू करणे – शेती करत असताना त्यासोबतच इतर जोडधंदे सुरु करून उत्पन्न वाढण्यासाठी शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे.
- सर्वांना मदत – महिला शेतकरी आणि गरीब गरजूंना खास मदत देऊन आजकाल शेती करणे खूप कठीण झाले आहे. कधी पाऊस शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याच समस्यांवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने एक खास योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (PoCRA). ही योजना फक्त पैसे देण्यापुरती मर्यादित नाही, तर ती शेतकऱ्यांची शेती अधिक चांगली आणि सोपी बनवते. नानासर्वांना सोबत घेऊन विकास करणे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आहेत.
- लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- पाच हेक्टर पर्यंत जमीन असलेले लहान आणि मध्यम शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
- गट लाभार्थी – महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या.
- भूमिहीन मजूरही या योजनेत अर्ज करू शकतात.
योजनेचे फायदे
- या योजनेच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर खूप सकारात्मक परिणाम होईल, तसेच या योजनेमुळे सहभागी शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होईल. कापूस आणि सोयाबीन पिकवण्याची शेतकऱ्यांची उत्पन्न वाढून ते दुप्पट होईल.
- ही योजना राबवत असताना शेतकऱ्यांना शेतीची नवनवीन माहिती मिळेल. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त उत्पादन कसे मिळवायचे याची माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल.
- शेती बरोबरच शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या कृषी पूरक व्यवसायांना या योजनेतून चालना मिळेल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ( POCRA 2.0 ) अंतर्गत पुढील प्रकल्प राबविण्यात येतील.
- सिंचन प्रकल्प – विहीर, सामूहिक शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन.
- जैविक उत्पादने – सेंद्रिय खते,गांडूळ खत, जैविक खत व कीटकनाशके यांचे उत्पादन.
- अवजार बँक – ट्रॅक्टर चलित अवजारे तसेच पॉवर टिलर,बैल चलित,मनुष्य चलित अवजारे.
- प्रक्रिया उद्योग – धान्य प्रक्रिया उद्योग
- कृषी पूरक उद्योग – कुक्कुट पालन, शेळी पालन, मत्स्य पालन, मधमाशी पालन, रेशीम उद्योग.
- बियाणे प्रकल्प
- गोदाम, कोल्ड स्टोरेज
- बायोगॅस आणि जैव इंधन निर्मिती.
अर्ज प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आहे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरून अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम dbt.mahapocra.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे किंवा MahaVISTAAR-AI या ॲप वरून देखील नोंदणी करू शकता.
- त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती, जमिनीचा सातबारा उतारा आणि बँक खात्याचा तपशील भरावा लागेल.
- तुम्हाला कोणत्या कामासाठी मदत हवी आहे. ते निवडून अर्ज सबमिट करा.
- अर्ज मंजूर झाल्यावर पुढील सूचनानुसार कार्यवाही करावी लागते. त्यानंतर पैसे थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

या योजनेचे दोन टप्पे असून त्यानुसार आपण माहिती पाहणार आहोत.
पहिला टप्पा (2018 – 2024) –
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील 5142 गावांचा समावेश होतो. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जास्त दुष्काळग्रस्त भागांचा समावेश होतो. या टप्प्यासाठी 4000 कोटी रुपयांचे बजेट होते, ज्यापैकी 70% निधी जागतिक बँकेने दिला होता. या टप्प्यात शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने बजेट 5469 कोटी रुपयांपर्यंत वाढले. यातून आतापर्यंत 4 लाख 85 हजार शेतकऱ्यांना 3816 कोटी रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी कशी पहायची ?
तुम्ही तुमच्या गावाचे नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी मध्ये तपासू शकता. यासाठी dbt.mahapocra.gov.in या लिंक वर क्लिक करा किंवा वेबसाईटला भेट द्या . इथे तुम्हाला ”इतर दुवे” या टॅब वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला PDF स्वरूपात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यादीच्या 5142 गावांची यादी दिसेल. त्यामध्ये तुमच्या गावाचे नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी मध्ये आहे का ते तपासू शकता, तसेच ‘ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका ’ या टॅब वर क्लिक करून तुम्ही शेतकऱ्यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी पाहू शकता.
टप्पा 1 व टप्पा 2 मधील फरक
| घटक | पहिला टप्पा | दुसरा टप्पा |
| कालावधी | 2018 – 2024 | 2024 पासून |
| गावांची संख्या | 5142 गावे | 6959 / 7201 गावे |
| जिल्हे | 15 जिल्हे | 21 जिल्हे |
| बजेट | रु. 5469 | रु. 6000 कोटी |
दुसरा टप्पा (2024 पासून पुढे)
पहिल्या टप्प्याच्या यशानंतर, सरकारने दुसरा टप्पा सुरू केला आहे. नवीन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील 6959 गावांचा समावेश आहे. काही ठिकाणी 7201 गावांचाही उल्लेख आहे. दुसऱ्या टप्प्यात फक्त दुष्काळ मुक्तीवर लक्ष न देता, शेतीत कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि नवीन पद्धती वापरून खर्च कमी करणे यावर भर दिला जात आहे.
या दुसऱ्या टप्प्यासाठी 6000 कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे. यामुळे नवीन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी अधिक गावापर्यंत पोहोचेल.
जागतिक बँकेच्या सहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा – 2
अंतर्गत निवडलेल्या गावांची यादी
जिल्हयानुसार संख्या
| अ. क्र. | जिल्हा | यादीतील अनुक्रमांक | गावे संख्या |
| 1 | अकोला | 1 ते 149 | 149 |
| 2 | अमरावती | 150 ते 603 | 454 |
| 3 | बीड | 604 ते 904 | 301 |
| 4 | भंडारा | 905 ते 1195 | 291 |
| 5 | बुलढाणा | 1196 ते 1505 | 310 |
| 6 | चंद्रपूर | 1506 ते 2066 | 561 |
| 7 | छत्रपती सांभाजीनगर | 2067 ते 2362 | 296 |
| 8 | धाराशिव | 2363 ते 2500 | 138 |
| 9 | गडचिरोली | 2501 ते 3032 | 532 |
| 10 | गोंदिया | 3033 ते 3325 | 293 |
| 11 | हिंगोली | 3326 ते 3473 | 148 |
| 12 | जळगाव | 3474 ते 3792 | 319 |
| 13 | जालना | 3793 ते 3969 | 177 |
| 14 | लातूर | 3970 ते 4185 | 216 |
| 15 | नागपूर | 4186 ते 4748 | 563 |
| 16 | नांदेड | 4749 ते 5123 | 375 |
| 17 | नाशिक | 5124 ते 5655 | 532 |
| 18 | परभणी | 5656 ते 5828 | 173 |
| 19 | वर्धा | 5829 ते 6211 | 383 |
| 20 | वाशिम | 6212 ते 6400 | 189 |
| 21 | यवतमाळ | 6401 ते 6959 | 559 |
| एकूण ( गावांची संख्या ) | 6959 |
POCRA 2.0 साठी गावांची यादी पाहण्यासाठी खालील डाउनलोड बटणावर वर
क्लिक करा
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी मध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच सुधारेल व त्यांच्या जीवनावर त्याचे सकारात्मक बदल दिसून येतील.
पुढील लेख देखील वाचा इमेज वर क्लिक करा.

टप्पा एक मध्ये ही योजना राबवत असताना ऑनलाईन अर्ज करताना काहीतरी अडचणी आल्या होत्या. तसेच अनुदानाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. या समस्या लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्याची रचना केली आहे. या नवीन टप्प्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी अधिक सोपी आणि कार्यक्षम असेल.
थोडक्यात, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी मदत आहे, जी त्यांना हवामान बदलांशी लढण्यासाठी आणि शेतीत नविन तंत्रज्ञान वापरुन शेतीला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी सक्षम बनवते.भविष्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी मध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना आणखी फायदा होईल अशी अपेक्षा आहे.









