पंचायत समिती विहीर योजना

पंचायत समिती विहीर योजना रोजगार हमी योजना सिंचन विहीर साठी 4 लाख रुपये अनुदान दिले जात होते, त्यामध्ये वाढ करून आता 5 लाख रुपये इतके करण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाई मुळे गरीब व सामान्य शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये स्वखर्चाने सिंचन विहीर काढणे शक्य होत नाही. मजुरी दरामध्ये झालेली वाढ आणि बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य याचा खर्च देखील खूप वाढलेला आहे. त्यामुळे शासनाच्या बांधकाम विभागाच्या चालू दरसुची नुसार सिंचन विहिरीसाठी मिळणाऱ्या 4 लाख रुपये अनुदानात वाढ करून 5 लाख रुपये इतके करण्यात आले आहे.

रोजगार हमी योजना सिंचन विहीर उद्दिष्ट 

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सामजिक व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. महाराष्ट्रातील 14.9% कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखालील आहेत. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकरी यांना गरिबीतून बाहेर काढून त्यांचे दारिद्र्य संपविण्यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते.

राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करणे हा शासनाचा उद्देश असून भूजल सर्वेक्षणानुसार पाण्याची पातळी लक्षात घेउन,मनरेगा अंतर्गत लवकरात लवकर विहिरी खोदणे व सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा किफायतशीरपणे वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन या साधनांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर ठरणार आहे. पंचायत समिती विहीर योजना मधून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आर्थिक मदत मिळाल्यास आपोआपच त्यांच्या उत्पन्नात भर पडेल, महाराष्ट्रातील दारिद्र्य कमी होण्यास मदत मिळेल, शेतकरी समृद्ध होतील व मोठ्या संख्येने गरीब कुटुंबे लखपती करणे हा शासनाचा उद्देश पूर्ण होईल.

रोजगार हमी योजना सिंचन विहीर अंतर्गत पंचायत समिती विहीर योजना मध्ये नवीन सिंचन विहिरींची कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीतील लोकसंख्येच्या प्रमाणात कामे मंजूर केली जातात. ग्रामसेवकांकडे प्राप्त झालेले विहिरींचे अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या कार्यालयीन स्तरावर छाननी करून मान्य केले जातात. सिंचन विहिरींची कामे करताना येणाऱ्या अडचणी दूर करून व शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तींचे पालन करून पंचायत समिती विहीर योजना चा लाभ दिला जातो.

रोजगार हमी योजना सिंचन विहीर लाभार्थी व पात्रता.

पंचायत समिती विहीर योजना मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सिंचन विहीर अंतर्गत लाभ घेताना रोजगार हमी अधिनियमांमधील तरतुदीनुसार लाभार्थी ठरवले जातात. विशिष्ट प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्यक्रमानुसार लाभ दिला जातो. प्रवर्गातील लाभार्थी खालील प्रमाणे आहेत.

  • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 
  • भटक्या जमाती व निरधिसूचित जमाती ( विमुक्त जाती )
  • दारिद्र्य रेषेखाली असणारे लाभार्थी 
  • ज्या कुटुंबामध्ये स्त्री कर्ता असेल असे लाभार्थी 
  • ज्या कुटुंबामध्ये कर्ता व्यक्ती शारीरिकदृष्ट्या विकलांग असेल असे लाभार्थी.
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी 
  • इंदिरा आवास योजनेमधील लाभार्थी 
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वनात राहणारे अधिनियम 2006(2007 चा 2) नुसार वन हक्क धारक 
  • सिमांत शेतकरी 2.5 एकर पर्यंत शेत जमीन असणारे भूधारक 
  • अल्प भूधारक 5 एकर पर्यंत शेत जमीन असणारे भूधारक 

पंचायत समिती विहीर योजना साठी लाभ धारकाची पात्रता.

  • लाभधारकाकडे कमीत कमी 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • लाभधारकाच्या 7/12 वर या आधीच विहिरीची नोंद असू नये.
  • ज्या लाभार्थ्याला विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे त्याच्याकडे स्वतःचे जॉब कार्ड असावे.
  • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा ( online )
  • महाराष्ट्र भूजल ( पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोतांच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहीर घेता येणार नाही.
  • दोन सिंचन विहिरींच्या अंतरामध्ये अट घालण्यात आली असून दोन विहिरींमधील अंतर हे 150 मीटर पेक्षा कमी नसावे.एका विहिरीपासूनर 150 मीटर च्या पुढेच विहीर खोदण्यास अनुमती आहे. पण 150 मीटर च्या अंतराची अट ही पुढील बाबींना लागू राहणार नाही.  1) दोन सिंचन विहिरींमधील कमीत कमी 150 मीटर अंतराची अट ही Run Off Zone, अनुसूचित जाती  व जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यांच्यासाठी लागू करण्यात येऊ नये. 2) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सिंचन विहीर या अंतर्गत विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
  • एकापेक्षा जास्त लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील पण त्यांच्याकडे असलेले एकूण सलग जमीन क्षेत्र हे 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.

विहिर अनुदान योजना कागदपत्रे 

पंचायत समिती विहीर योजना साठी ग्रामपंचायत कडे अर्ज करावा लागतो व अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडून पंचायत समिती विहीर योजना चा लाभ घेता येतो. व रोजगार हमी योजना सिंचन विहीर साठी अर्थसहाय्य मिळते.

  • 7/12 उतारा ऑनलाईन 
  • 8 अ उतारा ऑनलाईन 
  • जॉब कार्ड ची झेरॉक्स 
  • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा 
  • सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबतचे सर्व लाभार्थ्यामध्ये झालेले करारपत्र.

रोजगार हमी योजना सिंचन विहीर अनुदान अर्ज व प्रस्ताव डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

रोजगार हमी योजना सिंचन विहीर अर्ज PDF

रोजगार हमी योजना सिंचन विहीर प्रस्ताव PDF

पंचायत समिती विहीर योजना 2025 अर्ज प्रक्रिया

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सिंचन विहीर अंतर्गत वैयक्तिक लाभासाठी सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो.

विहित नमुन्यातील अर्ज भरून ग्रामपंचायत कार्यालयातील पत्रपेटीत किंवा ग्रामसेवककडे अर्ज जमा करू शकतो तसेच MAHA-EGS Horticulture/Well App द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतो.

ग्रामपंचायतीकडे सिंचन विहिरीसाठी जमा झालेले अर्ज ऑनलाईन भरण्याचे काम ग्रामपंचायतीचे असते. ग्रामपंचायतचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत अर्ज ऑनलाईन भरले जातात.ग्रामपंचायतीकडून ग्रामसभा बोलावून, विहीर अनुदान योजनेचा प्रचार प्रसार व माहिती देऊन लाभार्थींची यादी तयार केली जाते व ग्रामसभेमध्ये लाभार्थ्यांचे अर्ज मान्य करून पंचायत समिती कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतात. मनरेगा कायद्याच्या तरतुदीनुसार जिल्हापरिषद कार्यालयाकडून अर्ज मंजूर केले जातात.

पंचायत समिती विहीर योजना मधून शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीरीसाठी 5 लाख रुपये अनुदान मिळवू शकतात.

MAHA-EGS Horticulture/Well App द्वारे ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

पंचायत समिती विहीर योजना अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या रोजगार हमी योजना नियोजन विभाग मार्फत MAHA-EGS Horticulture/Well App हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे.

MAHA-EGS Horticulture/Well App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून MAHA-EGS Horticulture/Well हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करायचे आहे. ॲप ओपन केल्यावर लाभार्थी लॉगिन यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर 3 ऑप्शन्स दिसतील.  “बागायती लागवड अर्ज”यावरती क्लिक करून आपण बागायती पिके लागवडीवर अनुदानासाठी अर्ज करू शकतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत आपल्या शेतावर फळबाग लागवड, फुल पिक लागवड आणि वृक्ष लागवड करण्यासाठी अर्ज करू शकतो. यामध्ये ग्रामपंचायत, कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभाग या विभागांकडून अर्थसहाय्य दिले जाते.

    “विहीर अर्ज” यावरती क्लिक करून आपण विहिरिसाठी अर्ज करू शकतो.

   “अर्जाची स्थिती” यावर क्लिक करून केलेल्या अर्जाची स्थिती पाहू शकतो.

“ विहीर अर्ज ” यावरती क्लिक करून अर्जदाराचा तपशील भरायचा आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका, ग्राम पंचायत, गावाचे नाव, मनरेगा जॉब कार्ड क्रमांक भरायचा आहे. 

   मनरेगा जॉब कार्डचा फोटो किंवा पीडीएफ स्वरुपात अपलोड करायचा आहे.

   लाभार्थ्यांची वर्गवारी यामध्ये आपला प्रवर्ग निवडायचा आहे.

अर्जदारकडे असलेली एकूण जमीन 8 अ प्रमाणे, ज्या जमिनीवर विहीर घ्यायची आहे त्याचा भूमापन क्रमांक, धारण क्षेत्र भरून 7/12 व 8 अ अपलोड करायचा आहे.                               

   

सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड क्रमांक भरायचा आहे.

नंतर आपल्याला प्रपत्र अ दाखवले जाईल या वरील माहिती पाहून पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

आता आपल्याला प्रपत्र ब दाखवले जाईल या मध्ये योजनेच्या अटी व निकष दाखवले जातील ते वाचून झाल्यावर “अर्ज जमा करा” वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.OTP Enter करून प्रस्तुत करा वर क्लिक करायचे आहे.

पुढे आपल्याला “ धन्यवाद, अर्ज यशस्वीरित्या प्रस्तुत केला गेला असा मेसेज दाखवला जाईल व अर्ज सबमिट होईल.

अर्ज सबमिट झाल्यावर अर्ज स्थिती यावर क्लिक करून आपण अर्जाची स्थिती पाहू शकतो.

शेतीसाठी लागणारे ड्रोन फवारणी यंत्राची किंमत,अनुदान व माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

विहीर खोदण्यासाठी मार्गदर्शक तत्वे 

पंचायत समिती विहीर योजना चा लाभ घेत असताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अटी, शर्ती व अधिनियमातील तरतुदीनुसार मार्गदर्शक तत्त्वांनुसार सिंचन विहिरीचे काम केले गेले पाहिजे. यामध्ये नियमानुसार विहीर कोठे खोदावी कोठे खोदू नये. या बाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

पंचायत समिती विहीर योजना चा लाभ घेताना विहीर कोठे खोदु नये ?

  • भूपृष्ठावर जेथे खडक दिसत असेल अशा जागेवर विहीर खोदु नये.
  • डोंगराचा कडा असलेले ठिकाण तसेच आसपासच्या विहिरी पासून 150 मीटर अंतराच्या आत विहीर खोदु नये.
  • जेथे मातीचा थर 30 सेंमी पेक्षा कमी आहे अशा भूभागात विहीर खोदता येणार नाही.
  • जेथे मुरमाची ( झिजलेला खडक) खोली 5 मीटर पेक्षा कमी असेल अशा भूभागात विहीर खोदता येणार नाही.

पंचायत समिती विहीर योजना चा लाभ घेताना विहीर कोठे खोदावी ?

  • नाल्याच्या संगमाजवळ व दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात जेथे मातीचा कमीत कमी 30 सेंमी चा थर व जास्तीत जास्त 5 मीटर खोलीपर्यंत मऊ ( झिजलेला खडक ) आढळतो तेथे विहीर खोदावी.
  • नदी व नाल्याच्या उथळ गाळाच्या प्रदेशात 
  • जमिनीच्या सखल भागात जेथे कमीत कमी 30 सेंमी पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मुरूम ( झिजलेला खडक) आढळतो तेथे विहीर खोदावी.
  • नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे विहीर खोदु शकतो परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.
  • घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात विहीर खोदु शकतात.
  • नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळू रेती व गारगोट्या यांचा थर दिसून येतो तेथे.
  • नदीचे नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भुभागाच्या ठिकाणी विहीर खोदु शकतो.
  • अचानक दमट वाटणाऱ्या किंवा दमट असणाऱ्या जागेत विहीर खोदु शकतो.

 अशा प्रकारे आपण पंचायत समिति विहीर योजना चा अर्ज करून सिंचन विहीरीचा लाभ घेऊ शकतो .

Leave a Comment