ट्रॅक्टर अवजारे अनुदान

Table of Contents

ट्रॅक्टर अवजारे अनुदान योजना 

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कृषी यंत्रांचा वापर करताना कृषी यंत्रांची उपलब्धता सहजपणे व्हावी व कृषी यंत्रे खरेदी करताना शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत “ कृषी यांत्रिकीकरण योजना “ राबविली जाते. यामध्ये कृषी यंत्रे, ट्रॅक्टर व ट्रॅक्टर अवजारे अनुदान दिले जाते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) ने थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

ट्रॅक्टर अवजारे अनुदान साठी कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना राबविण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल चालविले जात असून त्याद्वारे शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारले जातात.

ट्रॅक्टर अवजारे अनुदान देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेतून खाली दिलेल्या कृषी यंत्रे व अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते.

  • ट्रॅक्टर 
  • ट्रॅक्टर चलित अवजारे 
  • पॉवर टिलर 
  • पॉवर टिलर चलित अवजारे 
  • बैल चलित यंत्र 
  • बैल चलित अवजारे 
  • मनुष्य चलित यंत्र 
  • मनुष्य चलित अवजारे 
  • प्रक्रिया संच 
  • काढणी पश्चात तंत्रज्ञान 
  • फलोत्पादन यंत्र 
  • फलोत्पादन अवजारे 
  • वैशिषट्यपूर्ण यंत्र अवजारे 
  • स्वयंचलित यंत्रे 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प भूधारक, बहु भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना ट्रॅक्टर अवजारे अनुदान हे 50 % तर इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टर अवजारे अनुदान हे 40 % दिले जाते.

वैयक्तिक शेतकऱ्यांना वरील अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते त्याच प्रमाणे सामुहिकरीत्या यंत्र खरेदीसाठी उद्योजक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच सहकारी संस्था यांना देखील कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर अवजारे अनुदान चा लाभ दिला जातो.त्यामध्ये भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र अंतर्गत दोन बाबींसाठी अर्थसहाय्य पुरवले जाते 

1) भाडे तत्वावरील सेवा पुरविण्यासाठी औजारे बँकेची स्थापना करण्यासाठी.

2) भाडे तत्वावरील सेवा पुरविण्यासाठी उच्च तंत्रज्ञान, उच्च उत्पादनक्षम औजार बँकेची स्थापना करण्यासाठी.

भाडेतत्वावरील सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी शासनाकडून अवजारे खरेदी करताना प्रत्येक अवजारावर अनुदानाची जास्तीत जास्त मर्यादा ठरविण्यात आली असून ठराविक मर्यादेपर्यंत किंवा एकूण खर्चाच्या 40 % पर्यंत अनुदान दिले जाते.

अर्जदाराने प्रत्यक्ष झालेला खर्च नमूद केल्यावर विविध मर्यादेनुसार योग्य ते वर्गीकरण करून त्यानुसार अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात येते.

ट्रॅक्टर अवजारे अनुदान साठी राबविल्या जाणाऱ्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यामागे शासनाचा उद्देश व धोरण 

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश 

शेती मध्ये काम करत असताना जेथे मानवीश्रम किंवा बैलांचा ऊर्जेचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. व यांत्रिक ऊर्जेचा कमी प्रमाणात वापर केला जातो. अशा क्षेत्रामध्ये कृषी यंत्रांचा वापर करून कृषी यांत्रिकीकरण साठी प्रोत्साहन देणे आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे, प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरूकता निर्माण करणे हा शासनाच्या कृषी विभागाचा उद्देश आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी शासनाचे धोरण

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजारे अनुदान चा लाभ देण्यासाठी, वैयक्तिक आणि सामुहिकरीत्या कृषी यंत्र व अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे वैयक्तिक आणि सामुहिकरीत्या सहभागीधारांना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहित करणे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता 

कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर अवजारे अनुदान मिळवन्यासाठी शेतकऱ्याकडे पुढील प्रमाणे पात्रता असावी लागते.

  • शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 अ चा दाखला असावा.
  • लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील शेतकरी असल्यास त्यांचा जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  • ट्रॅक्टर अवजारे अनुदान लाभ घेताना फक्त  एकाच औजारासाठी अनुदान दिले जाईल म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर फक्त ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाईल किंवा एका औजारासाठीच अनुदान मिळेल.
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळवू शकतो परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असेल.
  • एका घटकासाठी किंवा औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटकासाठी किंवा औजारासाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला सन 2020-21 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्ष ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही.2021-22 मध्ये इतर औजारासाठी लाभ घेता येईल.

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • 7/12 उतारा 
  • 8 अ दाखला 
  • जे अवजार खरेदी करायचे त्याचे कोटेशन 
  • केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल 
  • जातीचा दाखला ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी )
  • स्वयंघोषणापत्र 
  • पुर्वसंमती पत्र 

5 लाख रुपयांच्या विहीर अनुदान योजनेची माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा.

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 

 ट्रॅक्टर अवजारे अनुदान साठी कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अर्ज करण्यासाठी कृषी विभागाच्या mahadbt या पोर्टल वर जावून ऑनलाईन पदधतीने अर्ज करावा लागतो, अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे 

अर्ज करताना सर्वप्रथम अर्जदाराची नोंदणी करावी लागते.mahadbt या संकेतस्थळावर जाऊन New Applicant Registration यावरती क्लिक करायचे आहे.

पुढे वैयक्तिक आणि गट असे दोन ऑप्शन दाखवले जातील. स्वतंत्रपणे वैयक्तिक अर्ज भरण्यासाठी वैयक्तिक हा पर्याय निवडायचा आहे, तसेच सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, गैर सरकारी संस्था, शेतकरी गट, उद्योजक यांनी नोंदणीसाठी गट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

नोंदणी करताना आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधार कार्ड सोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवून प्रामाणिकरण करणे हा एक पर्याय आहे. तर मोबाईल नंबर आधार नोंदणीकृत नसल्यास बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करणे हा दुसरा पर्याय आहे.

पुढे वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड तयार करण्यासाठी सांगण्यात येईल. आपण तयार केलेला वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून लॉगइन करू शकतो.

लॉगइन केल्यानंतर वापरकर्त्याचे प्रोफाईल तयार करावे लागते. यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, जात तपशील, उत्पन्नाचा तपशील, अधिवास तपशील, बँक तपशील, कुटुंब तपशील, जमीन तपशील, पीक तपशील आणि इतर माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करायचे आहे.

नोंदणी प्रक्रिया व वापरकर्ता प्रोफाईल पूर्ण झाल्यावर मुख्यपृष्ठावर पुढील घटक दाखवले जातील.

  • कृषी यांत्रिकीकरण 
  • बियाणे,औषधे व खते 
  • सिंचन सुविधा 
  • फळबाग लागवड 
  • SC – ST शेतकऱ्यांसाठी विशेष योजना 

ट्रॅक्टर अवजारे अनुदान साठी “कृषी यांत्रिकीकरण “च्या “बाबी निवडा” यावरती क्लिक करायचे आहे.

पुढे “मुख्य घटक” यावर क्लिक केल्यानंतर “ कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ” यावरती क्लिक करून तपशील निवडायचा आहे. तपशीलमध्ये आपल्याला “ ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित अवजारे ” ही बाब निवडायची आहे.

 एच पी श्रेणी निवडून, यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे यावर क्लिक करून आपल्याला हवे असलेले अवजार निवडायचे आहे. 

अवजारांचा प्रकार निवडून अटी शर्ती यावर क्लिक करून “ जतन करा ” यावरती क्लिक करायचे आहे.

सर्व बाबी निवडून झाल्यावर मुख्यपृष्ठावर “ अर्ज करा ” यावरती क्लिक करायचे आहे व अनेक बाबी निवडल्या असतील तर प्राधान्यक्रम निवडून, अटी शर्ती वर क्लिक करून “ अर्ज सादर करा ” यावर क्लिक करायचे आहे.

पुढे Payment चे ऑप्शन दाखवले जाईल.Payment ची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्जाची स्थिती Elegible For Lottery असे दाखवले जाईल.

ट्रॅक्टर अवजारे अनुदान साठी अर्ज करण्यासाठी महा डीबीटी पोर्टल ला भेट द्या क्लिक करा.

सर्व शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची कृषी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने सोडत काढली जाते. त्यामध्ये निवड झाल्यास अवजाराचे कोटेशन आणि तपासणी अहवाल अपलोड करण्यास SMS द्वारे सांगितले जाते.

अवजार खरेदीसाठी पूर्वसंमती मिळाल्यावर अवजार खरेदी करून खरेदिबिल व इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. कृषी विभागाकडून सर्व कागदपत्रांची पडताळणी करून झाल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा केली जाते.

वरील प्रक्रिया पूर्ण करताना वेळोवेळी नोंदणीकृत मोबाईल वर SMS द्वारा सूचना देण्यात येतात. वरील प्रमाणे नोंदणी पासून ते अनुदान वितरणा पर्यंतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आपण ट्रॅक्टर अवजारे अनुदान चा लाभ घेऊ शकतो.

ट्रॅक्टर अवजारे अनुदान

ट्रॅक्टर अवजारे अनुदान

 राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित अवजारे व इतर कृषी यंत्रे यांच्या खरेदीवर अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, अल्प भूधारक आणि बहुभूधारक शेतकरी,महिला शेतकरी यांना 50% अनुदान तर इतर लाभार्थींना 40% अनुदान दिले जाते.

वैयक्तिकरित्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर व ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित अवजारे खरेदीसाठी शासनाने ठरवलेल्या कमाल मर्यादे च्या आतमध्ये अनुदानाची रक्कम दिली जाते ,वरील प्रमाणे लाभार्थी प्रकारानुसार अनुदानाची टक्केवारी पुढील सर्व अवजारांना लागू आहे.

ट्रॅक्टर व पॉवर टिलर साठी इंजिन एच पी प्रकारानुसार अनुदानाची कमाल मर्यादा व टक्केवारी 

बाब व्हिल ड्राईव्ह प्रकार एच पी श्रेणी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, अल्प भूधारक आणि बहुभूधारक शेतकरी,महिला शेतकरी
50 %
इतर लाभार्थी
40 %
ट्रॅक्टर 2 व्हिल ड्राईव्ह 8 ते 20 PTO HP100000 75000
20 पेक्षा जास्त ते 40 PTO HP125000100000
40 पेक्षा जास्त ते 70 PTO HP125000100000
4 व्हिल ड्राईव्ह 8 ते 20 PTO HP100000 75000
20 पेक्षा जास्त ते 40 PTO HP125000100000
40 पेक्षा जास्त ते 70 PTO HP125000100000
पॉवर टिलर 8 BHP पेक्षा कमी 6500050000
8 BHP व त्यापेक्षा जास्त 8500070000

20 BHP पेक्षा कमी इंजिन क्षमता असणाऱ्या ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित ट्रॅक्टर अवजारे अनुदान

अवजारांच्या प्रकारानुसार अनुदानाची कमाल मर्यादा व टक्केवारी ट्रॅक्टर अवजारे अनुदान

यंत्र ,औजार ,उपकरण यंत्र ,औजार उपकरणाचा प्रकार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, अल्प भूधारक आणि बहुभूधारक शेतकरी,महिला शेतकरी
50 %
इतर लाभार्थी
40 %
नांगर मोल्ड बोर्ड नांगर 2000016000
तव्याचा नांगर 20000 16000
चीजल नांगर 10000 8000
वखर वखर 2000016000
पॉवर वखर 40000 32000
जमिन सुधारणा औजारे बंड फार्मर 40000 32000
क्रष्ट ब्रेकर 40000 32000
पोस्ट होल डिगर 30000 24000
लेव्हलर ब्लेड 20000 16000
कल्टीव्हेटर कल्टीव्हेटर ( मोगडा )20000 16000
रोटोकल्टीव्हेटर 40000 32000
आंतरमशागत औजारे विडस्लॅशर20000 16000
ग्रास विडस्लॅशर25000 20000
पॉवर विडर ( 2 BHP पेक्षा कमी इंजिन चलित )25000 20000
फरो ओपनर फरो ओपनर 20000 16000
रीजर रीजर 2000016000
चिखलनी औजार रोटो पडलर 4000032000
केज व्हील 20000 16000
प्लान्टर व ट्रान्सप्लान्टर बटाटा प्लान्टर30000 24000
रेज्ड बेड प्लान्टर ( BBF )30000 24000
प्लान्टर3000024000
बहुपीक प्लान्टर ( 5 फण )30000 24000
शून्य मशागत बहुपीक पेरणी यंत्र 30000 24000
सरी वरंबा प्लान्टर30000 24000
शुगरकेन कटर/स्ट्रिपर प्लान्टर ( 5 फण )30000 24000
न्युमॅटिक प्लान्टर50000 40000
न्युमॅटिक व्हेजिटेबल सीडर 50000 40000
रेज्ड बेड प्लान्टर इन्क्लाईन प्लेट व शेपर
अटॅचमेंट सह (5 ते 7 फण )(BBF)
50000 40000
न्युमॅटिक व्हेजिटेबल ट्रान्सप्लान्टर 50000 40000
पेरणी यंत्र स्ट्रिप टिल ड्रिल ( 5 फण )30000 24000
पेरणी यंत्र/बियाणे -खत पेरणी यंत्र ( 5 फण )15000 12000
बीज प्रक्रिया ड्रम 15000 12000
अक्वा फर्टी सीड ड्रिल ( 5 ते 7 फण )15000 12000
पीक संरक्षण औजारे ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर ( एअर कॅरिअर / एअर असिस्ट )125000 100000
ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर ( बूम टाईप )3700028000
ट्रॅक्टर ऑपरेटेड इलेक्ट्रो स्टॅटिक स्प्रेअर250000200000
कापणी यंत्रे ट्रॅक्टर ड्रॉन रिपर30000 24000
रिपर कम बाइंडर 30000 24000
कांदा काढणी यंत्र 30000 24000
भुईमूग शेंगा तोडणी यंत्र ( इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी )30000 25000
बटाटा काढणी यंत्र 30000 24000
भुईमूग काढणी यंत्र 30000 24000
मल्चिंग यंत्र प्लास्टीक मल्चिंग यंत्र 50000 40000
फॉरेज / ग्रास अँड स्ट्रॉ / रेसिडयू मॅनेजमेंट ( कटर / श्रेडर )स्ट्रॉ रिपर25000 20000
राईस स्ट्रॉ चॉपर 30000 24000
ऊस पाचट कुट्टी 25000 20000
ब्रश कटर ( इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी )30000 25000
कडबा कुट्टी ( इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी )20000 16000
कोकोनट फ्रोंड चॉपर25000 20000
स्टबल शेव्हर 25000 20000
मोवर ( इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी )30000 25000
मोवर श्रेडर ( सर्व पिकांसाठी )(कॉटन श्रेडर )( इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी )30000 25000
फ्लायल हारव्हेस्टर (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी )30000 25000
मळणी यंत्र मळणी यंत्र ( इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी )30000 25000
बहुपीक मळणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी )30000 25000
भात मळणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर/ ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी 30000 25000
उफणणी पंखा ( इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी 30000 25000
मका सोलणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी30000 25000
ड्रोन फवारणी यंत्र किंमत

ड्रोन फवारणी यंत्राचे प्रकार,किंमत,अनुदान व अधिक माहितीसाठी क्लिक करा.

20 BHP पेक्षा जास्त ते 35 BHP पर्यंत इंजिन क्षमता असणारे ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित ट्रॅक्टर अवजारे अनुदान

अवजारांच्या प्रकारानुसार अनुदानाची कमाल मर्यादा व टक्केवारी व ट्रॅक्टर अवजारे अनुदान

यंत्र ,औजार ,उपकरणयंत्र ,औजार उपकरणाचा प्रकारअनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, अल्प भूधारक आणि बहुभूधारक शेतकरी,महिला शेतकरी
50 %
इतर लाभार्थी
40 %
नांगर मोल्ड बोर्ड नांगर 30000 25000
तव्याचा नांगर 30000 25000
चीजल नांगर 20000 16000
हायड्रोलिक पल्टी नांगर ( 2 बॉटम )70000 56000
मेकॅनिकल पल्टी नांगर ( 2 बॉटम )40000 32000
वखर वखर 30000 25000
पॉवर वखर 60000 50000
जमीन सुधारणा औजारे बंड फॉर्मर 60000 50000
क्रष्ट ब्रेकर 6000050000
पोस्ट होल डिगर 40000 30000
लेव्हलर ब्लेड 30000 25000
लेझर लँड लेव्हलर 200000160000
कल्टीव्हेटरकल्टीव्हेटर(मोगडा)30000 25000
रोटोकल्टीव्हेटर60000 50000
रोटोव्हेटर रोटोव्हेटर ( 5 फुट )42000 34000
फरो ओपनर फरो ओपनर 30000 25000
रिजर रीजर 30000 25000
चिखलणी औजारे रोटो पडलर 6000050000
केज व्हील 3000025000
पेरणी व लागवड यंत्रे बटाटा प्लान्टर40000 30000
रेज्ड बेड प्लान्टर (BBF)4000030000
प्लान्टर1900015000
बहुपीक प्लान्टर (5 फण )40000 30000
शून्य मशागत बहुपीक पेरणी यंत्र 18000 16000
रीज फरो प्लान्टर 4000030000
न्युमॅटिक प्लान्टर 7500060000
न्युमॅटिक व्हेजिटेबल सीडर 75000 60000
न्युमॅटिक व्हेजिटेबल ट्रान्सप्लान्टर 4000030000
रेज्ड बेड प्लान्टर इन्क्लाईन प्लेट व शेपर
अटॅचमेंट सह ( 5 ते 7 फण ) ( BBF )
7500060000
न्युमॅटिक व्हेजिटेबल ट्रान्सप्लान्टर 7500060000
पेरणी यंत्र स्ट्रिप टिल ड्रिल ( 7 फण )19000 15000
पेरणी यंत्र ( 7 फण )1800016000
खत व बी पेरणी यंत्र ( 7 फण ) 18000 16000
बीज प्रक्रिया ड्रम 18000 16000
भात पेरक ( DRS)20000 16000
हॅपी /टर्बो सीडर ( 9 फण )72800 58200
अक्वा फर्टी सीड ड्रिल ( 9 फण )75000 60000
पीक संरक्षण औजारे ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर ( एअर कॅरिअर / एअर असिस्ट )125000100000
ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर ( बूम टाईप )37000 28000
ट्रॅक्टर ऑपरेटेड इलेक्ट्रो स्टॅटिक स्प्रेअर250000200000
कापणी यंत्रे ट्रॅक्टर ड्रॉन रिपर40000 30000
रीपर कम बाईंडर (ट्रॅक्टर ड्रॉन )125000 100000
भुईमुग शेंगा तोडणी यंत्र ( इंजिन/इलेक्ट्रिक मोटर 3-5 HP /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी )40000 30000
कांदा काढणी यंत्र 40000 30000
बटाटा काढणी यंत्र 40000 30000
भुईमुग खोदणी यंत्र 40000 30000
मल्चिंग यंत्र प्लॅस्टिक मल्चिंग यंत्र 75000 60000
स्ट्रॉ मल्चर माउंटेड टाईप – 5 फुट 67200 53800
फॉरेज / ग्रास अँड स्ट्रॉ / रेसिडयू मॅनेजमेंट ( कटर / श्रेडर )स्ट्रॉ रिपर75000 60000
राईस स्ट्रॉ चॉपर 19000 15000
ऊस पाचट कुट्टी4000030000
फ्लायल हारव्हेस्टर (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी ) 40000 30000
ब्रश कटर (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी ) 40000 30000
चाफ कटर ( 3 ते 5 HP इंजिन/इलेक्ट्रिक मोटर चलित किंवा पॉवर टिलर चलित ,35 BHP पेक्षा कमी ट्रॅक्टर चलित )28000 22000
कोकोनट फ्रोंड चॉपर4000030000
स्टबल शेव्हर4000030000
मोवर (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी ) 40000 30000
मोवर श्रेडर ( बहु उद्देशीय / सर्व पिकांसाठी )(कॉटन श्रेडर) (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी ) 40000 30000
श्रेडर 6720053800
फीड ब्लॉक मशीन 150000 120000
बेलर (राऊंड )(14 किलो पेक्षा कमी प्रती बेल )150000 120000
स्ट्रॉ चॉपर 67200 53800
मळणी यंत्र मळणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी ) 40000 30000
बहुपीक मळणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी ) 40000 30000
भात मळणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी ) 40000 30000
मका सोलणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी ) 40000 30000
आंतरमशागत औजारे विड स्लॅशर30000 25000
ग्रास विड स्लॅशर3500030000
पॉवर विडर (२ HP पेक्षा जास्त इंजिन
ऑपरेटेड )
3500030000
वाहतूक साधने रेक ( लहान क्षमता )75000 60000
ट्रेलर / ट्रॉली (क्षमता 3 टन पर्यंत )60000 50000

35 BHP पेक्षा जास्त इंजिन क्षमता असणारे ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित ट्रॅक्टर अवजारे अनुदान

अवजारांच्या प्रकारानुसार अनुदानाची कमाल मर्यादा व टक्केवारी ट्रॅक्टर अवजारे अनुदान

यंत्र ,औजार ,उपकरणयंत्र ,औजार उपकरणाचा प्रकारअनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, अल्प भूधारक आणि बहुभूधारक शेतकरी,महिला शेतकरी
50 %
इतर लाभार्थी
40 %
नांगर मोल्ड बोर्ड नांगर 50000 40000
तव्याचा नांगर 50000 40000
हायड्रोलिक पल्टी नांगर ( 2 बॉटम )70000 56000
हायड्रोलिक पल्टी नांगर ( 3 बॉटम )8950071600
मेकॅनिकल पल्टी नांगर ( 2 बॉटम )40000 32000
मेकॅनिकल पल्टी नांगर ( 3 बॉटम )50000 40000
वखर वखर 5000040000
बंड फॉर्मर ( PTO ऑपरेटेड )150000 120000
बंड फॉर्मर 35000 30000
ट्रेन्च मेकर 150000120000
क्रष्ट ब्रेकर 100000 80000
जमीन सुधारणा औजारे सब सॉइलर 55000 45000
पोस्ट होल डिगर 75000 60000
लेव्हलर ब्लेड 50000 40000
लेजर लँड लेव्हलर 200000 160000
बँक हो लोडर डोजर (ट्रॅक्टर ऑपरेटेड )350000 280000
कल्टीव्हेटरकल्टीव्हेटर ( मोगडा )50000 40000
रोटो कल्टीव्हेटर100000 80000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
रोटाव्हेटर
रोटाव्हेटर ( 5 फुट )42000 34000
रोटाव्हेटर ( 6 फुट )44800 35800
रोटाव्हेटर ( 7 फुट )47600 38100
रोटाव्हेटर ( 8 फुट )5040040300
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
फरो ओपनर
फरो ओपनर 50000 40000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
रीजर
रीजर 50000 40000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
चिखलणी औजारे
रोटो पडलर 100000 80000
केज व्हील 50000 40000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
पेरणी व लागवड यंत्रे
बटाटा प्लान्टर ( ऑटोमेटिक )75000 60000
रेज्ड बेड प्लान्टर ( BBF )35000 30000
प्लान्टर 63000 50000
बहुपीक प्लान्टर ( 9 पेक्षा जास्त फण )75000 60000
शून्य मशागत पेरणी यंत्र ( 9 पेक्षा जास्त फण )7500060000
रीज फरो प्लान्टर75000 60000
न्युमॅटिक प्लान्टर225000 180000
न्युमॅटिक व्हेजिटेबल सीडर 225000180000
न्युमॅटिक व्हेजिटेबल ट्रान्सप्लान्टर225000 180000
रेज्ड बेड प्लान्टर इन्क्लाईन प्लेट व शेपर
अटॅचमेंट सह
90000 70000
कसावा प्लान्टर ( 9 फण )225000180000
शुगरकेन कटर / स्ट्रिपर प्लान्टर ( 5
फण )
75000 60000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
पेरणी यंत्र
स्ट्रिप टिल ड्रील ( 9 फण आणि त्यापेक्षा जास्त )2000016000
शून्य मशागत पेरणी यंत्र ( 9 फण )20000 16000
खत व बी पेरणी यंत्र ( 9 फण )21300 17000
खत व बी पेरणी यंत्र (11 फण )24100 19300
खत व बी पेरणी यंत्र (13 फण ) 26900 21500
खत व बी पेरणी यंत्र (15 फण ) 2800022400
शून्य मशागत खत व बी पेरणी यंत्र ( 9
फण)
21300 17000
शून्य मशागत खत व बी पेरणी यंत्र ( 11
फण)
2410019300
शून्य मशागत खत व बी पेरणी यंत्र ( 13
फण)
2690021500
शून्य मशागत खत व बी पेरणी यंत्र ( 15
फण)
2800022400
भात पेरक (DRS)2000016000
हॅपी / टर्बो सीडर ( 9 फण )72800 58200
हॅपी / टर्बो सीडर ( 10 फण )7560060500
हॅपी / टर्बो सीडर ( 11 फण )7840062700
ऑटोमॅटिक भात रोपवाटिका पेरणी यंत्र 175000140000
अॅक्वा फर्टी सीड ड्रील ( 9 पेक्षा जास्त फण )7500060000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
पीक संरक्षण औजारे
ट्रॅक्टर मोउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर ( एअर कॅरिअर / एअर असिस्ट )125000 100000
ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर ( बूम टाईप )3700028000
ट्रॅक्टर ऑपरेटेड इलेक्ट्रो स्टॅटिक स्प्रेअर250000200000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
कापणी यंत्रे
ट्रॅक्टर ड्रॉन रिपर 75000 60000
रीपर कम बाईंडर ( ट्रॅक्टर चलित )150000120000
भुईमुग शेंगा तोडणी यंत्र 10000080000
कांदा काढणी यंत्र 8000065000
बटाटा काढणी यंत्र 40000 35000
भुईमुग खोदणी यंत्र 7500060000
कम्बाईन हार्वेस्टर ( स्वयंचलित 14 फुट
कटरबार सह )
800000640000
कम्बाईन हार्वेस्टर ( ट्रॅक्टर चलित 10 फुट
कटरबार सह )
300000240000
कम्बाईन हार्वेस्टर ( ट्रॅक्टर शिवाय 10 फुट
कटरबार सह )
300000240000
कम्बाईन हार्वेस्टर ( ट्रॅक्टर चलित 6 ते 8 फुट
कटरबार सह )
1100000880000
कम्बाईन हार्वेस्टर ( ट्रॅक्टर चलित 6 फुटपेक्षा कमी
कटरबार सह )
700000560000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
मल्चिंग यंत्र
प्लास्टीक मल्चिंग यंत्र75000 60000
स्ट्रॉ मल्चर माउंटेड टाईप – 5 फुट67200 53800
स्ट्रॉ मल्चर माउंटेड टाईप – 6 फुट7280058200
स्ट्रॉ मल्चर माउंटेड टाईप – 7 फुट7840062700
स्ट्रॉ मल्चर माउंटेड टाईप – 8 फुट8400067200
स्ट्रॉ मल्चर – ट्रेल टाईप 126000101000
स्ट्रॉ मल्चर – कोम्बो टाईप 140000112000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
फॉरेज / ग्रास अँड स्ट्रॉ / रेसिड्यू मॅनेजमेंट ( कटर /
श्रेडर)
स्ट्रॉ रिपर 130000104000
राईस स्ट्रॉ चॉपर 6300050000
मोवर (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा जास्त )10000080000
मोवर श्रेडर ( बहु उद्देशीय / सर्व पिकांसाठी )(कॉटन श्रेडर) (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा कमी जास्त )10000080000
ऊस पाचट कुट्टी 125000100000
स्ट्रॉ चॉपर / श्रेडर / मल्चर माऊंटेड
टाईप- 5 फुट
6720053800
स्ट्रॉ चॉपर / श्रेडर / मल्चर माऊंटेड
टाईप- 6 फुट
67200 53800
स्ट्रॉ चॉपर / श्रेडर / मल्चर माऊंटेड
टाईप- 7 फुट
6720053800
स्ट्रॉ चॉपर / श्रेडर / मल्चर माऊंटेड
टाईप- 8 फुट
6720053800
स्ट्रॉ मल्चर – ट्रेल टाईप126000101000
स्ट्रॉ मल्चर – कोम्बो टाईप140000112000
फॉरेज हारव्हेस्टर ( इंजिन / इलेक्ट्रिक
मोटार 5 BHP पेक्षा कमी / पॉवर
टिलर /ट्रॅक्टर ३५ BHP पेक्षा जास्त )
10000080000
फ्लायल हारव्हेस्टर ( इंजिन / इलेक्ट्रिक
मोटार 5 BHP पेक्षा कमी / पॉवर
टिलर /ट्रॅक्टर ३५ BHP पेक्षा जास्त )
10000080000
चाफ कटर ( 5 HP इंजिन/इलेक्ट्रिक मोटर चलित किंवा पॉवर टिलर चलित ,35 BHP पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित )10000080000
कोकोनट फ्रोंड चॉपर6300050000
स्टबल शेव्हर8000064000
श्रेडर6720053800
फीड ब्लॉक मशीन ( ताशी 200 किलो
पेक्षा जास्त क्षमता )
300000240000
बेलर ( राऊंड ) ( 14 ते 16 किलो पेक्षा
कमी प्रती बेल )
200000 160000
बेलर ( राऊंड ) ( 16 ते 25 किलो पेक्षा
कमी प्रती बेल )
550000 440000
बेलर ( राऊंड ) ( 180 ते 200 किलो पेक्षा
कमी प्रती बेल )
900000720000
बेलर ( रेक्टॅग्युलर) ) ( 180 ते 200 किलो पेक्षा
कमी प्रती बेल )
600000480000
राईस स्ट्रॉ स्लॅशर25000 18000
ऊस खोडवा मॅनेजर125000100000
कॉटन स्टॉक अपरूटर7500060000
वूड चिपर 125000100000
ब्रिकेट मेकिंग मशीन ( 500 ते 1000 किलो प्रतितास क्षमता )500000400000
श्रब मास्टर / कटर कम स्प्रेडर2500018000
स्ट्रॉ चॉपर6720053800
मल्चर माऊंटेड टाईप 6 फुट7280058200
मल्चर माऊंटेड टाईप 7 फुट7840062700
मल्चर माऊंटेड टाईप 8 फुट8400067200
मल्चर (ट्रेल्ड टाईप )126000101000
मल्चर ( कोम्बो टाईप )140000112000
सुपर स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टम कम्बाईन
हार्वेस्टरला जोडण्यासाठी
5600045000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
मळणी यंत्र
मळणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा जास्त )100000 80000
बहुपीक मळणी यंत्र प्रतितास 4 टन पर्यंत क्षमता (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा जास्त )10000080000
मळणी यंत्र प्रतितास 4 टन पेक्षा जास्त क्षमता (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा जास्त )250000200000
बहुपीक मळणी यंत्र प्रतितास 4 टन पेक्षा जास्त क्षमता (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा जास्त )250000200000
भात मळणी यंत्र प्रतितास 4 टन पर्यंत क्षमता (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा जास्त )10000080000
मका सोलणी यंत्र (इंजिन/इलेक्ट्रिक मोटार 5 BHP पेक्षा कमी /पॉवर टिलर / ट्रॅक्टर 35 BHP पेक्षा जास्त )100000 80000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
आंतरमशागत औजारे
विड स्लॅशर200000 160000
ग्रास विड स्लॅशर75000 60000
पॉवर विडर (5 HP पेक्षा जास्त इंजिन
ऑपरेटेड )
6300050000
विडर ( PTO ऑपरेटेड )7500060000
ट्रॅक्टर अवजारे अनुदान
वाहतूक साधने
मॅन्युअल स्प्रेडर75000 60000
फर्टिलायझर स्प्रेडर ( PTO ऑपरेटेड )75000 60000
हे रेक 150000120000
इनफिल्डर ( 5 HP पेक्षा कमी इंजिन / इलेक्ट्रिक
मोटार / पॉवर
टिलर /ट्रॅक्टर ३५ BHP पेक्षा जास्त )
6300050000

Leave a Comment